लोकसभा निवडणुकीनंतर आता मुंबईसह राज्यातील विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी आज निवडणूक पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी पहाटेपासून पदवीधरांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे काम सुरू केलंय. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होत आहे.
या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. हा मतदारसंघ गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावून दिली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील आपल्या सर्व शाखांमधून हक्काचे मतदार मतदानासाठी आणण्यास खबरदारी घेतली आहे.
दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघात तब्बल ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे यांचा समावेश आहे. सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात जास्त नोंदणी केलेल्या उमेदवाराला विजयाची नेहमी संधी असते.
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहे. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, शिवसेना शिंदे गटाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत.
नाशिक मतदारसंघाची निवडणूक पैसे, साड्या आणि इतर साहित्याच्या वाटपावरून चांगलीच गाजली आहे. शिंदे गटाने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. दरम्यान, पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शासनाने विशेष सुट्टी मंजूर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.