VIDEO: 'आरोपी अन् मुख्यमंत्र्यांचे घनिष्ठ संबंध, मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?, वरळी अपघातावरुन राऊतांचे टीकास्त्र

Maharashtra Politics Breaking News: हिट अँड रन केसमधील मुख्य आरोपी, ज्यांचा मुलगा आहे त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
VIDEO: 'आरोपी अन् मुख्यमंत्र्यांचे घनिष्ठ संबंध, मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?, वरळी अपघातावरुन राऊतांचे टीकास्त्र
CM Eknath Shinde and Sanjay RautSaam Tv

मयुर राणे, मुंबई|ता. ९ जुलै २०२४

जम्मू- काश्मिरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यामध्ये पाच जवान शहीद झाले. या घटनेवरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट मोदी- शहांना लक्ष करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"पाच जवानांच्या हत्या झाल्या आपण त्याला बलिदान म्हणूया किंवा हुतात्मा म्हणूया. पाच जवानांवर ज्या प्रकारे हल्ला झाला, हे सरकार आल्यापासून गेल्या एक महिन्यात एकूण सात हल्ले जवानांच्या ताफ्यावर झाले आहेत. प्रधानमंत्री जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्हाही जम्मू कश्मीर मध्ये जवानांवर हल्ले झाले आणि त्यात जवान शहीद झाले," असे संजय राऊत म्हणाले.

"देशाचे गृहमंत्री अमित शहा या देशाला भ्रमित करत आहेत खोटं बोलत आहेत की जम्मू-काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे शांतता नांदते. पण 370 कलम हटवल्यापासून जम्मू कश्मीरमध्ये अधिक अस्थिरता आणि अशांतता निर्माण झाली आहे. जम्मू काश्मिरच्या विधानसभेला अद्याप टाळे लागलेला आहे. जम्मू कश्मीरच्या निवडणुका अद्याप घेऊ शकला नाहीत हे कसलं लक्षण आहे?" असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

VIDEO: 'आरोपी अन् मुख्यमंत्र्यांचे घनिष्ठ संबंध, मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?, वरळी अपघातावरुन राऊतांचे टीकास्त्र
Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी, आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? पडद्यामागे काय घडतंय?

"हिट अँड रन केसमधील मुख्य आरोपी, ज्यांचा मुलगा आहे त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत ते ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत, 24 तासात काय त्यांना पोलिसांनी अटकच कशी केली?" असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तसेच "पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केलेला आहे. एका मराठी महिलेला गाडीखाली चिरडून हा मिहीर शहा मुंबई पोलिसांच्या हातून सुटतो कसा, कुठे गेला आहे तो? सुरतला गेला आहे की गुहाटीला लपवला आहे त्याला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असे आव्हानही संजय राऊतांनी केले.

VIDEO: 'आरोपी अन् मुख्यमंत्र्यांचे घनिष्ठ संबंध, मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?, वरळी अपघातावरुन राऊतांचे टीकास्त्र
Hinganghat Crime : रस्त्यात अडवत सोने व्यापाऱ्याला लुटले; पाच जणांना २४ तासात अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com