Maharashtra Live News Update: गडचिरोलीत भीषण अपघात, दोन जण ठार

Maharashtra Marathi News Updates : आजच्या ताज्या बातम्या, शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६; महाराष्ट्रातील ठळक घडामोडी| Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 21st February 2026 | Saam TV Marathi News
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

 Beed : माजलगावात लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Gadchiroli : गडचिरोलीत भीषण अपघात, दोन जण ठार 

ट्रॅक्टरला ट्रकची पाठीमागून धडक,

दोन जण ठार, दोघे गंभीर जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात अपघात

ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर उलटला

ट्रॅालीखाली 4 मजूर दबले, तर 1 बाहेर फेकल्या गेला

बंधाऱ्याच्या कामावरून हे मजूर ट्रॅक्टरने येत होते.

Ambernath: काटई–बदलापूर मार्गावर पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया, ट्रॅफिक जॅम

अंबरनाथ तालुक्यातील पालेगाव परिसरात हायवेवर पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले असून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा जोरदार फवारा उडत रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे काटई–बदलापूर मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आणि काही काळ ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण झाली.

Dharashiv : धाराशिवमध्ये कुञ्यासोबत अनैसर्गिक कृत्य

कुञ्यासोबत अनैसर्गिक कृत्य, धाराशिवच्या कळंब शहरातील विकृत आणि किळसवाणी घटना

फक्त ६७० रुपये वीज बिल थकीत असताना वीज पुरवठा केला खंडीत,

कल्याणमध्ये वलीपीर रोड परिसरात महावितरणच्या अतिशय धक्कादायक गलथान कारभार समोर आला आहे. केवळ ६७० रुपये वीज बिल थकीत असताना महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला. ६७० रुपये बीज भरल्यानंतर २४ तास उटूनही वीज पुरवठा सुरळित केला गेला नाही. घरात एक ८० वर्षाची आजीबाई आणि त्यांचा मतीमंद मुलगा आहे. २४ तासापासून दोघेही अंधारात आहेत. बील भरले नाही म्हणून पुरवठा खंडीत केला. बील भरल्यानंतर २४ तासानंतर ही पुरवठा सुरळित केला गेला नाही. या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अल्पवयीन कार चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दिली जोरदार धडक

- प्रताप नगर परिसरात सायंकाळी अपघाताची घटना...

- राधे मंगलम हॉल समोरून स्वरूप नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला अपघात.

- जखमी महिलेला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- अपघाताची माहिती मिळताच प्रताप नगर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल.

- प्राथमिक तपासात कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याची माहिती... पोलिसांनी चालकास घेतलं ताब्यात....

- वाहन चालकाची आणि पालकांची जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू....पुढील तपास प्रतापनगर पोलिस करत आहे...

कल्याण-बदलापूररोडवरील पाईपलाईन फुटली

लातूरमध्ये संतांच्या पादुकांचे रिंगण सोहळा

उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा या कार्यक्रमाचा आजपासून पुढचे नऊ दिवस लातूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत जनाबाई संत एकनाथ यांच्यासह इतर संतांच्या पादुका आज लातूरमध्ये दाखल झाल्या, शहरातून भक्तीमय वातावरणात दिंडी काढल्यानंतर खंडापूर येथे या संतांच्या पादुकांचा रिंगण सोहळा पार पडला, अतिशय भक्तिमय वातावरणात पुढची नऊ दिवस या भागात हरिनामाचा जागर होणार आहे.

रायगडच्या महाडमध्ये राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शिंदे सेनेचे आंदोलन

दिल्ली येथे सुरू असलेल्या AI समिट दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त आंदोलनाचे पडसाद आज रायगड जिल्ह्यात उमटले. रायगडच्या महाडमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. राहूल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळा जाळून शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, जालन्यात सरपंच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

जालन्यात सरपंच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष, सरकारने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचानाच प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतल्याने जल्लोष.

सरपंच संघटनानी अनेक दिवसांपासून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नेमाव यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर सरपंच संघटनांच्या पाठपुराव्याला यश आल असून सरकारने विद्यमान सरपंचांनाच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतल्याने जालन्यात सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत फटाके फोडून जल्लोष केलाय.

कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना; डंपरच्या धडकेनंतर दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडला

डंपरचा दुचाकीस्वाराला धक्का लागल्याने दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडला.

घटना CCTV कॅमेरात कैद..दुचाकीस्वार जखमी ,दुचाकीचे नुकसान

KDMC कडून पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला होता खड्डा

जालन्यात युवा सेनेचं जोडे मारो आंदोलन

दिल्ली येथे झालेल्या AI समिट मध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर ठीक ठिकाणी त्याचे पडसाद उमटत असून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.जालना शहरात देखील युवा सेनेचे पदाधिकारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. जालना शहरातल्या सावरकर चौकात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून दिल्ली येथील घटनेचा निषेध व्यक्त केलाय. शिवाय जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली

मालेगावात अद्वय हिरे यांची पत्रकार परिषद; अब्रुनुकसान खटला मागे, संजय राऊत व दादा भुसे यांचे आभार

मालेगाव (नाशिक) येथे भाजप नेते अद्वय हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अब्रुनुकसान प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात संजय राऊत यांनी आपल्याला मोठी मदत केल्याचे सांगत, आज त्यांच्यावरील खटला संपल्याचे हिरे यांनी नमूद केले. हा खटला आपल्या कारणामुळेच दाखल झाला होता, ही वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी कबूल केले. राऊत यांनी दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकारत, त्यांच्या मदतीचे ऋण कधीही फिटणार नाही, असे हिरे म्हणाले.

तसेच मंत्री दादा भुसे यांनी मोठ्या मनाने खटला मागे घेतल्याबद्दल आभार मानले. दरम्यान, राष्ट्रीय कंपनी कायदा न्याय अधिकरण (NCLT) येथे 2017 पासून सुरू असलेली केस न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य टाळत निकालाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबईनंतर ठाण्यात बिश्नोई गँगची खंडणीची धमकी; मोठ्या उद्योगपतींना केलं लक्ष्य

मुंबईनंतर आता ठाण्यातही बिश्नोई गॅंग कडून खंडणीसाठी धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील एका मोठ्या उद्योगपतीला AOIP कॉलद्वारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे खंडणीविरोधी पथक तपास करत आहे.

धमकी मिळालेल्या व्यक्तीचा गोडाऊनचा मोठा व्यवसाय असून सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. याआधी मुंबईत अनेक सेलिब्रिटींना बिश्नोई गॅंगकडून धमक्या मिळाल्या होत्या. आता ठाण्यात उद्योगपती लक्ष्य झाल्याने पुढे राजकारण्यांनाही निशाणा साधला जाईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी सतर्कता वाढवली असून तपास वेगाने सुरू आहे.

भाजप कार्यालयाबाहेर कॉग्रेसचं आंदोलन

मुंबईत काँग्रेसकडून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. एआय समिटदरम्यान राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. अंधेरी येथे भाजपच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते घोषणाबाजी करत आंदोलन करत असून, दादरमध्येही आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध करत लोकशाही मूल्यांचा अवमान झाल्याचा आरोप केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध आंदोलन

देशाची दिशाभूल करीत भारतीय युवक व राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या वतीने आंदोलन

स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, शिवसेना भवन समोर आंदोलन सुरू

लाईव्ह फ्रेम दिली आहे

ग्रीन फ्युचरसाठी भारत–ब्राझीलची भागीदारी वाढणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत–ब्राझील संबंधांतील ऊर्जा सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. हायड्रोकार्बनसोबतच नवीकरणीय ऊर्जा, इथेनॉल ब्लेंडिंग आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल या क्षेत्रांत सहकार्य वाढवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्लोबल बायोफ्युएल अलायन्समध्ये ब्राझीलचा सक्रिय सहभाग हरित भविष्यासाठी दोन्ही देशांच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे मोदी म्हणाले.

तसेच, आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा (CDRI)साठी को-चेअरपदाचा प्रस्ताव दिल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे त्यांनी अभिनंदन केले. या क्षेत्रातील ब्राझीलचा अनुभव CDRI अधिक बळकट करण्यास मदत करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

सांगलीतील विटा शहरात भाजपकडून राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद; चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडण्यात आले. नगरपालिकेमार्फत राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी गुहागर–कराड राष्ट्रीय महामार्गावरील काम रोखले.

नेत्यांच्या म्हणण्यानुसार, 30 फूट रस्ता असताना विटा नगरपालिकेने केवळ 21 फूट रेखांकन केले असून त्याच आधारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम केले जात आहे. त्यामुळे विटा शहरातील रस्ता अरुंद होऊन नागरिकांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असा आरोप करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली.

चिखला गावात परिस्थिती शांत; नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य, शांततेचे आवाहन

चिखला गावामध्ये सध्या परिस्थिती पूर्णपणे शांततापूर्ण असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच पोलीस प्रशासन गावात तैनात असून सर्व नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नागरिकांनीही शांतता राखण्यास सहकार्य केले असून गावात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी चिखला गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सर्वांनी संयम ठेवून शांतता राखावी, असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Parbhani: परभणीतील बोरी बंद, ४६ जणांवर गुन्हे दाखल प्रकरण

परभणी -

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे बोरीकरांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवल्या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

४६ जणांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आज बोरी बंद

Sambhajinagar: अनाधिकृत बॅनर्स काढताना मुकुंदवाडीत महापालिका कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर -

अनाधिकृत बॅनर्स काढताना मुकुंदवाडीत महापालिका कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

अमोल दिनकर जाधव (वय 27 रा. मुकुंदवाडी, संजयनगर ) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.

जखमी रवी रणधीर रिडलाॅन (वय 38) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कुटुंबीयांचा आक्रोश

Sangli: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

काही लोकांचा राजकीय भ्रमाचा भोपळा फुटेल, त्यांचे प्रश्न ते मांडू शकतात त्याबद्दल दुमत नाही पण त्यांचा भ्रम पसरवण्याचा भोपळा फुटेल, आषाढी का सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे रोहित पवारांनी विमान अपघात प्रकरणी व्ही पी सिंग यांच्या केलेल्या अटकेच्या मागणीवरून मंत्री शेलार यांनी हटोला लगावला आहे,मिरजेमध्ये भोपळ्यापासून तंतुवाद्य कशी बनतात,याची माहिती घेतल्यानंतर मंत्री शेलार यांनी आमदार रोहित पवारांच्या प्रश्नावरून,हे खोचक टीका केली आहे.

Pune: पुण्यात हडपसर येथील भीषण आगीत १९ झोपड्या जळून खाक

पुण्यात हडपसर येथील भीषण आगीत १९ झोपड्या जळून खाक

लोहिया गार्डन मगरपट्टा चौकाजवळील भोरी पडळ भागात भीषण आग लागून एकोणीस झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

अज्ञाताने एका घरासमोरील पेटवून दिलेल्या मोटारसायकलच्या धगीने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.यामध्ये राहणाऱ्या भाडेकरूंचा संपूर्ण संसार जळून खाक झाला.

वेळीच सर्व कुटुंबे घराबाहेर पडल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Pandharpur: अजितदादांच्या अपघातप्रकरणी विमान कंपनी मालकाची नार्को टेस्ट करा, महाराष्ट्र विकास सेनेची मागणी

पंढरपूर -

अजित पवार विमान अपघात प्रकरणी विमान कंपनी मालकाची नार्को टेस्ट करावी

महाराष्ट्र विकास सेनेची मागणी

महाराष्ट्र विकास सेनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Raigad: पोलिस निरीक्षकाने महासंचालकांना पाठवलं आत्महत्येचे पत्र, रायगड पोलिस दलामध्ये खळबळ 

रायगड -

- रायगडच्या महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रमेश तडवी यांनी पोलिस महासंचालकांना दिल आत्महत्या करणार असल्याच पत्र

- महाड शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक पदावरून अचानक बदली

- गेल्या दोन वर्षात दोन वेळा बदली झाल्याने तडवी यांनी दिल आत्महत्येच पत्र

- महाड नगर पालिका निवडणुकी दरम्यान झालेला राजकिय राडा मानसिक त्रास आणि वरिष्ठ अधिकारी शंकर काळे जाती वाचक हिन वागणुक देत असल्याचा आरोप

- पोलिस निरिक्षकाने दिलेल्या आत्महत्येच्या पत्रामध्ये गोंधळ

Mumbai:  शिवसेना नेत्या शायना NC मानहानी प्रकरण, पुढील सुनावणी १६ मार्चला होणार

मुंबई -

- शिवसेना नेत्या शायना NC मानहानी प्रकरण

- माझगाव कोर्टात सुनावणीला शायना NC अणि खासदार अरविंद सावंत दोघेही उपस्थित होतो

- आज शायना NC यांची साक्ष नोंदविण्यात आली

- पुढील सुनावणी १६ मार्च रोजी होणार..

Wardha: बोर व्याघ्र प्रकल्पात आढळला दुर्मिळ काळा बिबट्या

वर्धा -

- बोर व्याघ्र प्रकल्पात आढळला दुर्मिळ काळा बिबट्या

- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात काळा बिबट्या आढळला

- काळा बिबट्या आढळल्याने कुतूहल

- बोर व्याघ्र प्रकल्पाची देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख

- बोर व्याघ्र प्रकल्पातील वनसंपदा, वन्यप्राण्यांचे आकर्षण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उद्या पुण्यात पत्रकार परिषद

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उद्या पुण्यात पत्रकार परिषद

भाजप काँग्रेस राड्यानंतर सपकाळ यांचा पहिला पुणे दौरा

दुपारी ३ वाजता हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद

पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये सपकाळ यांची पत्रकार परिषद

अनाधिकृत बॅनर्स काढताना महापालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

अनाधिकृत बॅनर्स काढताना मुकुंदवाडीत महापालिका कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

अमोल दिनकर जाधव (वय 27 रा. मुकुंदवाडी, संजयनगर ) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.

जखमी रवी रणधीर रिडलाॅन (वय 38) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे विलीनीकरणानंतर शरद पवार पक्षाची जबाबदारी अजितदादांकडे देणार होते

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते, सूत्र

शरद पवार सामाजिक कामात सक्रिय राहणार होते

मात्र शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावे हा अजितदादांचा होता आग्रह

राष्ट्रवादीचे विलीनीकरणानंतर शरद पवार पक्षाची जबाबदारी अजितदादांकडे देणार होते

शरद पवारांची राज्यसभेची टर्म एप्रिल महिन्यात संपणार आहे

इचलकरंजीत सुताच्या गोडाऊनला भीषण आग

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सांगली नाका परिसरातील सुताच्या दोऱ्याच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सांगली नाका परिसरातील कापड उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या सुताच्या गोडाऊनला अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर सुताचा साठा असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. या आगीत सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये राहुल गांधींचा अर्धनग्न फोटो हातात घेऊन आंदोलन

भारताची बदनामी राहुल गांधी व कॉग्रेस पार्टी करत असल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चा कडून नागपूरात आंदोलन

राहुल गांधींचा अर्धनग्न फोटो हातात घेऊन आंदोलन

नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

काँग्रेस पक्ष, राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी

राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा - रोहित पवार

संतांच्या पादुका लातूरमध्ये हेलिकॉप्टरने दाखल

संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम संत नामदेव, संत मुक्ताबाई , या संतांच्या पादुका लातूरमध्ये दाखल.

उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा या भक्तिमय कार्यक्रमासाठी संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने लातूरमध्ये दाखल झाले आहेत, लातूर शहरातून खंडापूर कार्यक्रमास स्थळाकडे या पादुका मार्गस्थ होतील.

महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या बैठकीत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

वाघोलीत होणारी ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून, जिल्ह्यासह राज्यभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महावितरणवर प्रशासनाला धरले धारेवर

६ महिन्यांपासून सौर ग्राहकांना चुकीची वीज बिले देऊन छळणाऱ्या महावितरणने कहर केला असून . थकबाकीच्या नावाखाली पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे सुमारे १०० ग्राहकांचा वीजपुरवठा आपोआप खंडित करण्यात आला. या कारवाईमुळे सरकारी वसतिगृहे, रुग्णालये आणि शेकडो घरे अंधारात बुडाली असून, संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.

Solapur: उजनी धरण पंचवीस दिवसात शंभरीवरून 75 टक्क्यावर

सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असणाऱ्या उजनी धरणातून गेल्या 25 दिवसात 25 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. तब्बल 13 टीएमसी पाणी हे जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी , कालवे हे दुधडी वरून वाहत आहेत. 25 जानेवारीला शंभर टक्के असणारे धरण आज मात्र 75 टक्क्यावर आले. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदी आणि कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

Nagpur: बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती.

बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती

गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता, सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे

सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय आला

तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता

केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला

Nanded: नांदेडमध्ये डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा प्रकार उघड

नांदेडच्या किनवट तालुक्यातील परोटी ते रिठा या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात येणारा डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्यास चा प्रकार उघड झाला आहे. या गावातील ग्रामस्थांनी हा डांबरी रस्ता चक्क हाताने उखडून दाखवून या रस्त्याच्या कामाचा दर्जा उघड केला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून चांगल्या दर्जाचा रस्ता बनवून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.

Pawna: पवना धरणात बुडून पिंपरीतील एका तरुणाचा मृत्यू...

पवना धरणात बुडून पिंपरीतील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋतिक कैलास साखरे वय 24 राहणार काळेवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या सात मित्रांसह पवनाधरण परिसरात फिरायला आला होता. सातही मित्र नदीच्या पात्रात उतरून पोहू लागले मात्र जलाशयात उतरलेल्या ऋतिक पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागल्याने पाहून मित्रांनी मदतीसाठी आरडा ओरड केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. स्थानिकांनी आणि मित्रांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क साधत लोणावळा पोलिसांनी सोबत संपर्क साधला. पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव कार्य पथकाला प्रचारण केले. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळांनी ऋतिक चा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पिंपरीला पाठवण्यात आला.. अधिक तपास लोणावळा पोलीस करीत आहे...

Raigad: रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता समीकरणाला येणार वेग

रायगड जिल्हा परिषद मध्ये सत्ता समीकरणाला वेग येत असून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची सध्या जोरदार हालचाल सुरू आहे. दोन्ही पक्षाचे विजयी उमेदवार सध्या गोव्यात एका आलिशान हॉटेल मध्ये असल्याची माहिती समोर आलीय.या व्हायरल फोटोत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असल्याचं दिसून येतंय.मात्र सर्वाधिक जागा जिंकून सत्तेपासून दूर राहिलेल्या शिंदे शिवसेनेला मित्र पक्षाकडून एकाकी पाडण्यासाठी ही खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीय शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आम्हाला सोबत न घेतल्यास पुढील निवडणुकीत वेगळा विचार करू असा इशारा भाजप आणि राष्ट्रवादीला दिलाय त्यामुळे रायगड मधील जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन समीकरणात कोण अध्यक्ष पदावर बसतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.

भीमा नदी पात्रात उजनी धरणाच्या पाणी सोडण्यावरून भाजप आणि काँग्रेस पक्षात श्रेयवादाची लढाई

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी पात्रात उजनी धरणाच्या पाणी सोडण्यावरून भाजप आणि काँग्रेस पक्षात श्रेयवादाची लढाई

उमराणी बंधारात पाणी अडवल्यामुळे भीमा नदी पात्र कोरडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीचा आणि पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी.

राज्य सरकारकडून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश काढल्याचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून स्वागताचे पोस्टर..

तर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून 14 फेब्रुवारी रोजी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी अधीक्षक अभियंत्याला पत्रावरून श्रेया घेण्याचा प्रयत्न.

कर्नाटक सरकारने उमराणी बंधाराची उंची वाढवल्यामुळे उजनी धरणातून सोडलेले पाणी तिथे अडवण्यात आले त्यामुळे भीमा नदी पात्र कोरडे पडले.

याचा फटका दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसला.

त्यामुळे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदारांकडून उजनी धरणातून भीमा पात्रात पाणी सोडण्याची करण्यात आली होती मागणी..

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी अचानक आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये महायुतीतच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सत्तेमध्ये कोण येणार ही उत्सुकता सातारा जिल्हा वाशीयांना लागून राहिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 27 राष्ट्रवादीला 20 तर शिवसेनेला 15 अशा जागा मिळाल्याने सत्तेसाठी असणारा 33 आकडा जुळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान भाजपाकडूनही जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदाचा दावा केला जात असल्याने अजूनही तीनही पक्षांच्या भूमिका गुलदस्तात आहेत. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या टिके मुळे दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. याबाबत रात्री अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात दरेगावी मुक्कामी आले आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच संपणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

MNREGA: मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा...

मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा...

प्रलंबित असलेल्या मजुरीसाठी राज्य शासनाकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर..

पुढील दोन ते तीन दिवसात मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा होणार...

तसेच मार्च अखेर पर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजूरीही वेळेत दिली जाणार...

मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीची रक्कम थकीत असल्याने आदिवासी बांधवांचा महत्त्वाचा होळी सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न मजुरांपुढे होता.

मात्र आता राज्य शासनाकडून मजुरांना दिलासा देण्यात आलाय.

SSC Exam: दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

पहिल्याच दिवशी प्रशासनाने 11 कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले

दहावीच्या परीक्षेला काल पासून सुरुवात

प्रशासनाकडून राज्यभर कॉपीमुक्त परीक्षेचे अभियान

मात्र काल पहिल्याचा दिवशी पुणे विभागीय मंडळात 10 तर नागपूर विभागीय मंडळात 1

अशा एकूण 11 विद्यार्थ्यांवर कॉपी केल्यामुळे कारवाई करण्यात आल्याची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

Pune: पुण्यात भंगाराच्या दुकानाला आग

पुण्यात भंगाराच्या दुकानाला आग

पुण्यातील बोपोडी मधील छाजेड पेट्रोल पंपाजवळ भंगारच्या दुकानात आगीची घटना

अग्निशमन दलाकडून 3 फायर गाड्या घटनास्थळी दाखल

आग विजवण्याचे काम सुरू असून आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आज चिखला काकड गावात जाणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज चिखला काकड गावात जाणार

काल रात्री लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता.

चिखला काकड गावामध्ये एका महिलेला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचं समोर आल आहे..

या महिलेला भेटण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज चिखला काकड गावात जाणार आहेत...

सकाळी दहा वाजता मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून चिखली काकड गावाकडे रवाना होतील

Pune: पुण्यातील गुलटेकडी परिसरात गोळीबार

पुण्यातील गुलटेकडी परिसरात गोळीबाराची घटना

अल्पवयीन सराईत आरोपीने गोळीबार केल्याची माहिती

दोन ते तीन राऊंड फायर केले असल्याची पुणे पोलिसांकडून प्राथमिक माहिती

दोन गटातील वादातून गोळीबार झाला असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

आरोपीकडून परिसरात भीतीच वातावरण पसरवण्यासाठी हवेत गोळीबार

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 893 शिक्षकांची पदे रिक्त

यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता मंजूर झाली आहे त्यानुसार जिल्ह्यात मुख्याध्यापक, शिक्षकांची जवळपास 893 पदे रिक्त आहेत यातील बहुतांश जागा पेशा क्षेत्रातील आहे त्यामुळे पेशा क्षेत्र वगळता उर्वरित खुल्या सर्वसाधारण जागेच्या पदभरतीला नव्याने मंजुरी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.

नागपूर महानगरपालिकामध्ये वाढीव पाणी बिलांबाबत तातडीची बैठक

नागपूर शहरातील 25 हजारांहून अधिक नागरिकांना ऑरेंज सिटी वॉटर (OCW)कडून वाढीव बिले प्राप्त नागरिकांमध्ये तीव्र संताप.

महापौर निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ बिल दुरुस्तीचे दिले निर्देश.

आमदार प्रवीण दटके यांनी मीटर चोरी आणि पाचपट बिलवाढीचा मुद्दा केला उपस्थित.

दूषित पाण्याच्या तक्रारी सात दिवसांत निकाली काढण्याचे आदेश.

वाढीव देयकांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश.

उपमहापौर, नगरसेवक व संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित नागरिकांच्या हितासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन

सुधारणा न झाल्याने डिसेंबर जानेवारीत एकूण ७ कोटींचा दंड.

बिल दुरुस्ती न झाल्यास सतरंजीपुरा, गांधीबाग व धंतोली झोन कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा

Bharat Gogawale: भाजप, राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून गोव्याला सदस्य हलवले,मंत्री भरत गोगावलेंचा टोला

रायगड जिल्हा परिषदेचे भाजप आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित सदस्यांना गोव्याला पाठवण्यात आले आहे. यावर बोलताना आम्ही त्यांचे सदस्य उचलू अशी भिती त्यांना असेल अस सांगताना आम्ही एकतरी सदस्य हलवला का असा खोचक प्रश्न रूपी टोला गोगावले यांनी लगावला आहे. याचवेळ राष्ट्रवादी भाजप युतीवर बोलताना आम्हाला दूर ठेवलं, तर पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत, शिवसेनेची गरज लागेल, तेव्हा आम्ही पाहू काय करायचं ते असा गर्भित इशाराही गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला दिला आहे. रायगडमध्ये सद्या जिल्हा परिषदेच्या सत्ता समिकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी, भाजपमध्ये वाद सुरु आहेत.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 38 हजारांवर विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

यवतमाळ जिल्ह्यात 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी शिष्यवृत्तीची परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मुळे 22 फेब्रुवारी रोजी होताहेत. 284 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेला जिल्ह्यात तब्बल 38 हजार 278 विद्यार्थी बसणार असून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आल्या आहेत.तसेच त्यांना परीक्षा घेण्यासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले असून शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषद प्रशासनाने सेस फंडातून भरले आहे.त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे इत्या पाचवीची विद्यार्थी संख्या 25 हजार 485 तर इयत्ता आठवीची विद्यार्थी संख्या 14 हजार 278 इतकी आहे.

Nashik: नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

नाशिक -

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात संध्याकाळ च्या सुमारास पावसाने लावली जोरदार हजेरी

दुपार पासून आकाशात ढगाळ वातवरण निर्माण झाले होते

संध्याकाळी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी धास्तावला

कांदा, गहू,सह अन्य पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com