Maharashtra Legislative council Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मातोश्रीवर बोलावली तातडीने बैठक; शरद पवार अन् नाना पटोलेही राहणार उपस्थित, काय आहे कारण?

Urgent Meeting Of MVA On matoshree : महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार अन् नाना पटोलेही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई : महाविकास आघाडीची आज २८ ऑगस्ट रोजी बुधवारी बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह (uddhav Thackeray) शरद पवार, नाना पटोले आणि संजय राऊत हे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नेमकं महाविकास आघाडीने ही बैठक का बोलावली आहे? या बैठकीमध्ये कोणती चर्चा होणार आहे, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

महाविकास आघाडीची मातोश्रीवर महत्वाची बैठक

मागील काही दिवसांपासून राज्यात गंभीर घटना घडत (Maharashtra Politics) आहेत. सत्ताधारी राज्यात जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटनांना पाठिंबा देत असल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीकडून केला जातोय. तसंच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीमध्ये चर्चा होईल, अशी माहिती मिळत आहे. तर महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि दिशा या बैठकीमधून ठरणार आहे.

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज २८ ऑगस्ट रोजी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह (uddhav Thackeray) शरद पवार, नाना पटोले आणि संजय राऊत हे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नेमकं महाविकास आघाडीने ही बैठक का बोलावली आहे? या बैठकीमध्ये कोणती चर्चा होणार आहे, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

महाविकास आघाडीची मातोश्रीवर महत्वाची बैठक

मागील काही दिवसांपासून राज्यात गंभीर घटना घडत (Maharashtra Politics) आहेत. सत्ताधारी राज्यात जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटनांना पाठिंबा देत असल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीकडून केला जातोय. तसंच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीमध्ये चर्चा होईल, अशी माहिती मिळत आहे. तर महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि दिशा या बैठकीमधून ठरणार आहे.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार ?

विधानसभा निवडणूक तोंडावर आली अन् राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीय. बदलापुरात झालेल्या बालअत्याचाराच्या घटनेनंतर तर राज्यात महिला आणि बाल अत्याचाराच्या प्रकरणांची मालिकाच सुरूच झाली (Meeting Of MVA On matoshree) आहे. पुण्यामध्ये काही गुंडांनी पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला केलाय. बांगलादेशातील हिंसाचारानंतर महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होताना दिसत आहे. हिंसक घटना वाढलेल्या आहेत. या सर्वच मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल

मालवणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर केवळ आठ महिन्यांत कोसळला. त्यामुळे सरकारवर विरोधक हल्लाबोल करत आहेत. शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण (sharad pawar nana patole)आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता, परंतु तो रोखला गेला. त्यानंतर मविआ मूक आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे आज होणारी बैठक अत्यंत महत्वाची असून पुढील रणनिती या बैठकीतून ठरणार असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT