Uddhav Thackeray Criticized PM Modi Saam Tv
मुंबई/पुणे

Haryana Election Result: ‘कौल’ इतक्या झपाट्याने कसे काय बदलू शकतात? सामना अग्रलेखातून उपस्थित केला प्रश्नचिन्ह

Saamana Editorial On Haryana Election Result: जम्मू-कश्मीरसारख्या राज्यात पंतप्रधान मोदी भाजपास विजयी करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपचे ढोंग उघड झाले आहे, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

Priya More

हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्ता कायम ठेवली. भाजपच्या या विजयावर विरोधकांकडून जोरदार टीकेचे झोड सुरू आहे. सामनाच्या अग्रलेखातून हरियाणाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. ‘कौल’ इतक्या झपाट्याने कसे काय बदलू शकतात?, असा सवाल सामाना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. तसंच, 'महाराष्ट्रातही मतविभागणीचा ‘खेला’ करायचा आणि फाटाफूट घडवून निवडणुका जिंकायच्या हाच भाजप आणि त्यांच्या मिंध्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातही हरयाणाप्रमाणेच घडेल असे फडणवीस वगैरे लोक म्हणतात ते यासाठीच. पण मराठी माणूस मनाने लेचापेचा नाही. तो विचाराने पक्का आहे. हरयाणाच्या निकालाने जे निराश झाले त्यांनी जम्मू–कश्मीरच्या विजयाकडे आशेने पाहायला हवे.', सल्ला सामनाच्या अगलेखातून देण्यात आला आहे.

'आम्ही हरयाणाप्रमाणे विजयी होऊ असे दावे करणाऱ्यांनी जम्मू–कश्मीरमधील मोदी-शहांच्या पराभवाकडेही त्याच सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. भाजपच्या पिपाण्या कितीही वाजल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही!', असा टोला देखील सामनातून भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावण्यात आला आहे. 'हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रात घडेल हे भाजप व त्यांच्या मिंध्यांचे स्वप्नरंजन म्हणायला हवे. महाराष्ट्रात आघाडीचे राजकारण आहे व ते भाजपास परवडणारे नाही. हरयाणात ‘ईव्हीएम’ मशीन घोटाळा झाला अशी तक्रार काँग्रेसतर्फे करण्यात आली. निवडणूक आयोग निष्पक्ष राहिला नाही यावर आता किती वेळा बोलायचे?', याचा उल्लेख देखील अग्रलेखामध्ये करण्यात आला आहे.

'हरयाणा विधानसभा निवडणुका जिंकल्याने भाजपात मोदींचा जयजयकार सुरू झाला, पण जम्मू-कश्मीरसारख्या राज्यात पंतप्रधान मोदी भाजपास विजयी करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपचे ढोंग उघड झाले आहे. हरयाणातील विजयाच्या जिलब्या खात असताना जम्मू-कश्मीरमध्ये माती खाण्याची वेळ का आली? याचे विश्लेषण भाजपच्या आंधळ्या पंडितांनी करणे गरजेचे आहे. हरयाणाचा निकाल महाराष्ट्रावर परिणाम करेल. हरयाणा जिंकला, आता महाराष्ट्र जिंकूच जिंकू, असा दावा भाजप व त्यांचा मिंधे गट करू लागला आहे. हरयाणा व महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीची तुलना करणे सर्वस्वी चुकीचे आहे.', असे मत देखील संजय राऊत यांनी अग्रलेखातून व्यक्त केले आहे.

'जम्मू-कश्मीरच्या पराभवाची चर्चा होत नाही पण हरयाणा विजयाचे ढोल वाजवले जात आहेत. आता फडणवीस वगैरे ‘पिपाण्या’ वाजवत आहेत की, महाराष्ट्रात हरयाणाप्रमाणे होईल. मग काय हो फडणवीस, तुमच्या त्या हरयाणाचा विजय तूर्त ठेवा बाजूला. महाराष्ट्र जम्मू-कश्मीरप्रमाणेच निकाल देईल, असे तुम्ही-आम्ही का म्हणू नये? जम्मू-कश्मीरात इंडिया आघाडीचा विजय झाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच विजय होईल.', असा दावा सामना आग्रलेखात करण्यात आला आहे.

तसंच, 'हरयाणात मतमोजणीची सुरुवात झाली तेव्हा 72 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती. म्हणजे हा लोकमताचा कौल होता. पण हा कौल नंतर बदलला. राजस्थान, मध्य प्रदेश निवडणुकांतही सुरुवातीला लोकमताचा कौल भाजपविरोधी होता. काँग्रेसची घोडदौड सुरू असतानाच निकाल फिरले. ‘कौल’ इतक्या झपाट्याने कसे काय बदलू शकतात? महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मिंध्यांचे सूत्र असे दिसते की, जास्तीत जास्त ‘अपक्ष’ उभे करून जातीय मतविभागणी करायची. हरयाणात हा अपक्षांचा खेळ भाजपने नक्कीच केला आहे. महाराष्ट्रातही मतविभागणीचा ‘खेला’ करायचा व फाटाफूट घडवून निवडणुका जिंकायच्या हाच भाजप व त्यांच्या मिंध्यांचा डाव आहे.', अशी टीका देखील सामनातून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: दर्यापूर राडा प्रकरणी, ४५ जणांवर गुन्हा दाखल

Viral Video: आरारारा खतरनाक! नागीण डान्स काही क्षण खरंच वाटला; तरुणाला नाचताना बघून नजर हटणारच नाही

Ajit Pawar vs Sharad pawar : बारामतीचा वाली कोण? शरद पवारांनंतर मीच वाली, दादांचं वक्तव्य, साहेबांकडून समाचार

Navneet Rana Rally Rada : दर्यापूरमध्ये राडा, नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या, सभेत मोठा गोंधळ

Today Horoscope: हितशत्रूपासून सावध रहाणं गरजेचं, वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT