Wardha News : भाजप युवा मोर्चाकडून एकाच दिवशी नियुक्ती, स्थगिती आणि रद्द; वर्ध्यात स्थानिक गटबाजीमुळे अडचण

Wardha News : आर्वी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दादाराव केचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक असलेले आर्वीचे रहिवासी सुमित वानखेडे यांच्यात सध्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे.
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी विधानसभेत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या अंतर्गत गटबाजीमुळे आता थेट भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षांना एकाच दिवसात सकाळी नियुक्ती दुपारी स्थगिती आणि संध्याकाळी नियुक्ती रद्द करण्याचे तीन पत्र काढावे लागले. एकाच दिवसात झालेल्या या घडामोडीचे पत्र सध्या व्हायरल झाले आहे. 

वर्ध्याच्या (Wardha) आर्वी विधानसभा मतदारसंघातील आष्टी येथील भाजप आमदार दादाराव केचे यांचे कार्यकर्ते असलेले भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आवेज खान यांची युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी ८ ऑक्टोबरला युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी पदी नियुक्ती केली. नियुक्तीचे पत्र येताच याच मतदारसंघातील (BJP) काही पदाधिकाऱ्यांनी आवेज खान यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. एवढंच नव्हे तर काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता नियुक्ती कशी केली? नियुक्ती रद्द न केल्यास थेट पदांच्या राजीनाम्याची धमकी दिल्याची माहिती आहे.

Wardha News
Solapur News : टोल न देता बॅरिकेड्स तोडून निघालेल्या ट्रकने सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडलं; पेनूर टोलनाक्यावरील घटना

अखेर रात्री काढले रद्दचे पत्र  

सदर नियुक्ती नंतरची परिस्थिती पाहता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांनी नियुक्तीला स्थगिती देण्याबाबतचे पत्र दुपारी काढले. मात्र स्थगिती नंतरही विरोध सुरूच होता. यामुळे रात्री आवेज खान यांची नियुक्ती रद्द करण्याचे पत्र भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष यांना काढावे लागले. एकाच दिवशी सकाळी नियुक्ती दुपारी स्थगिती आणि रात्री रद्द केल्याची ही पहिलीच घटना पहावयास मिळाली. एका दिवशी निघालेल्या तीन पत्राची चर्चा सध्या वर्धेच्या राजकीय वर्तुळात पहावयास मिळत आहे.

Wardha News
Barshi Vidhan Sabha : बार्शीचे अपक्ष आमदार भाजपच्या तिकिटावर उतरणार मैदानात; महायुतीच्या जागा वाटपपूर्वीच ठोकला दावा

उमेदवारीवरून रस्सीखेच 
आर्वी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दादाराव केचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक असलेले आर्वीचे रहिवासी सुमित वानखेडे यांच्यात सध्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे. या मतदारसंघात दोन्ही गटांकडून वेगवेगळे कार्यक्रम घेउन जनतेपर्यंत जात आपले शक्तिप्रदर्शन दाखविले जातं आहे. दादाराव केचे हे मलाच उमेदवारी मिळणार असा दावा करत आहे. तर सुमित वानखेडे सुद्धा उमेदवारीबद्दल आश्वस्त असल्याचे कळत आहे. या दोन गटांच्या गटबाजीमुळे भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष कडून करण्यात आलेल्या नियुक्तीला रद्द करावे लागल्याची चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com