Maharashtra Politics : नगरचं राजकारण पुन्हा तापले, विखेंचा लंकेंवर हल्लाबोल; म्हणाले पराभवाने मी खचलो नाही

Maharashtra Politics : टायगर अभी जिंदा है... पराभवाने मी खचलो नाही, असे वक्तव्य माजी खासदार सुजय विखे यांनी केलेय.
Sujay Vikhe vs Nilesh Lanke
Sujay Vikhe vs Nilesh LankeSujay Vikhe vs Nilesh Lanke
Published On

Sujay Vikhe vs Nilesh Lanke : अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी कुठे गेलेलो नाही, मी संपलेलो नाही असे म्हणालेत. टायगर अभी जिंदा है.." वादळ येत असतात.. असं म्हणत आपल्या पराभवामुळे माझं नाही तर मतदारसंघाचं आणि येणा-या पुढच्या पिढीचं नुकसान झाल्याचं सुजय विखे पाटील म्हणालेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव उज्जैन या ठिकाणी बोलताना सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाना साधलाय. निवडून आलेल्या माणसाच्या भाषणामध्ये कधीच समाजहिताच काम नाही, शेतकऱ्यांच्या हिताच काम नाही, परिवर्तन व्हावं असं कधीच ऐकायला मिळत नाही. फक्त हा बोगस, याला गाडू, तो हरामखोर, फक्त एवढंच ऐकायला मिळतंय, असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

काय म्हणाले निलेश लंके ?

मी संपलेलो नाही 'टायगर अभी जिंदा है' म्हणत सुजय विखे पाटलांनी खासदार निलेश लंकेंवर जोरदार टीका केली. तुम्ही कसं मतदान टाकता? कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पिढीचा कार्यक्रम झाला.. असे म्हणत नागरिकांच्या मतदानावरचं विखेंनी खंत व्यक्त केली.

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैन येथील कार्यक्रमात बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंकेवर जोरदार टीका केली आहे. मी कुठे गेलेलो नाही संपलेलो नाही टायगर अभि जिंदा है. अशे अनेक वादळ येत असतात मात्र निवडून आलेल्या माणसाच्या भाषणा मध्ये कधीच समाज हिताचं काम नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं काम नाही, परिवर्तन व्हावं असं कधीच ऐकायला मिळत नाही. फक्त हा बोगस, याला गाडू, तो हरामखोर फक्त एवढंच बोलतात, असा टोला सुजय विखे यांनी लकेंना लगावला.

तुम्ही कसं मतदान टाकता, आज जी गर्दी आहे त्यातल्या निम्म्या लोकांनी माझा कार्यक्रम लावला. तरी देखील मी तुमच्यामध्ये आलोय. पण कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पिढीचा कार्यक्रम तुम्ही लावला. मा‍झ्या पडण्याने नुकसान तुमच्या लोकांचं झालं आहे, अशी खंत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com