Maharashtra Politics : काँग्रेस पडले, 'ठाकरे' नडले; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी काय इशारा दिला? VIDEO

mahavikas aghadi News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरुय. त्यातच हरयाणाच्या निकालाने ठाकरे गटाच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. ठाकरे गटाने थेट आपलं मुखपत्र सामनातून काँग्रेसचे उट्टे काढलेत... सामनात नेमकं काय म्हटलंय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
 काँग्रेस पडले, 'ठाकरे' नडले; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी काय इशारा दिला? VIDEO
Maharashtra Politics :Saam tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटायला सुरुवात झालीय. हरयाणात काँग्रेसचा पराभव झाल्याने ठाकरे गटाने महाराष्ट्रात कुरघोडी सुरू केलीय. तर लोकसभेच्या विजयाने विधानसभेला मोठा भाऊ असल्याचा काँग्रेसचा दावा ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.. तर ठाकरे गटाने थेट पक्षाच्या मुखपत्रातून काँग्रेसला झोडून काढलंय.

ठाकरेंच्या मुखपत्रातून काँग्रेसला झोडपले

हरियाणात अनुकूल परिस्थिती असताना फायदा उठवण्यात काँग्रेसला अपयश

काँग्रेस नेत्यांचा फाजील आत्मविश्वास आणि अरेरावीमुळेच पराभव

काँग्रेसने मित्रपक्षांना दूर ठेवल्याने हरियाणात फटका

मित्रपक्ष सत्तेत वाटेकरी नको या भूमिकेमुळे काँग्रेसने हरियाणा गमावलं

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना हरियाणाच्या निकालातून शिकावे

 काँग्रेस पडले, 'ठाकरे' नडले; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी काय इशारा दिला? VIDEO
Maharashtra Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून महत्वाचा निर्णय? ओबीसींना मिळणार मोठा दिलासा, VIDEO

हरियाणाच्या निकालानंतर राऊतांनी राज्यातील जागा वाटपाच्या रस्सीखेचवरून काँग्रेसला इशारा दिलाय. तर अग्रलेख आणि राऊतांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने सावध प्रतिक्रीया दिलीय...

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली. त्यानंतर सर्व एग्झिट पोलनुसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालातून काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

 काँग्रेस पडले, 'ठाकरे' नडले; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी काय इशारा दिला? VIDEO
Assembly Election 2024: देवळा विधानसभेत नवा ट्वीस्ट! उमेदवारीसाठी सख्ख्या भावांमध्ये संघर्ष; भाजपची डोकेदुखी वाढली

हरियाणा विधानसभा निकाल

भाजप- 48

काँग्रेस- 37

जम्मू काश्मीर विधानसभा निकाल

नॅशनल कॉन्फरन्स- 42

भाजप- 29

काँग्रेस- 6

महाराष्ट्रातील ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरयाणातील निकालाने काँग्रेसला मोठा सेटबॅक बसलाय. मात्र आता ठाकरे गटाने सुरु केलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला प्रमुख नेत्यांनी ब्रेक लावला नाही तर त्याचा फटका विधानसभेला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com