Assembly Election 2024: देवळा विधानसभेत नवा ट्वीस्ट! उमेदवारीसाठी सख्ख्या भावांमध्ये संघर्ष; भाजपची डोकेदुखी वाढली

Maharashtra Assembly Election 2024: मागील दोन विधानसभा निवडणुकीत राहुल आहेर यांच्यासाठी थांबलो, मात्र यावेळी निवडणूक लढवणारच, असा इशारा केदा आहेर यांनी दिला आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra PoliticsSAAM Digital
Published On

Nashik Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभेच्या तिकिटावरुन इच्छुकांमध्ये जोरदार खडाजंगी दावे- प्रतिदावे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी चांगलीच वाढत आहे. अशातच आता नाशिकच्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भावाभावांमध्येच संघर्ष पाहायला मिळत असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Politics : शरद पवारांचे भाजप-अजितदादांना धक्के; विधानसभेसाठी काय आखली रणनीती? VIDEO

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चांदवड देवळा मतदासंघांचे विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल आहेर यांना त्यांचे सख्खे बंधू केदा आहेर यांनी आव्हान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी केदा आहेर यांनी दंड थोपटले असून उमेदवारीची मागणी केली आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत राहुल आहेर यांच्यासाठी थांबलो, मात्र यावेळी निवडणूक लढवणारच, असा इशारा केदा आहेर यांनी दिला आहे.

केदा आहेर हे नाफेडचे संचालक आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. आता त्यांनी चांदवड देवळा मतदासंघांतून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता उमेदवारीसाठी दोघा भावांमध्येच संघर्ष पाहायला मिळत आहे. महत्वाचं म्हणजे वरिष्ठ उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक असल्याचा मोठा दावाही केदा आहेर यांनी केला आहे. त्यामुळे आता देवळा मतदार संघा नवा ट्वीस्ट निर्माण झाला असून दोन टर्म आमदार असलेल्या राहुल आहेर यांचं तिकीट कापून केदा आहेर यांना उमेदवारी देण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

Maharashtra Assembly Election
Satara Accident News: मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले, १२ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत; साताऱ्यातील संताजनक घटना

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून आशिष देशमुख इच्छुक आहेत, अशातच आता भाजपचे काटोल मतदारसंघातील नेते चरणसिंग ठाकूर यांनीही याच मतदार संघावर दावा ठोकला आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी एकाच मंचावरुन आपल्या उमेदवारीची मागणी केली. भारसिंगी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी काका विरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली तर भाजपचे काटोल मतदारसंघातील नेते चरणसिंग ठाकूर यांनीही यंदा मला लढू द्या अशी विनंती केली

Maharashtra Assembly Election
Sanjay Raut News: 'काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर..' संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान; हरियाणा निकालावरुन साधला निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com