Maharashtra Politics : भाजप १५५ जागांवर ठाम, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा?

Maharashtra Election : महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलेय. काही जागांवर एकमत झालेले नाही. भाजप १५५ जागा लढवण्यावर ठाम आहे.
Maharashtra Election
Mahayuti Saam Digital
Published On

Maharashtra Mahayuti Seat Sharing : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीनंतर देशाला आता महाराष्ट्रातील निवडणुकीचे (maharashtra vidhan sabha election 2024) वेध लागले आहे. मविआ आणि महायुती यांच्यामध्ये राज्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सत्ता आल्यामुळे राज्यातील भाजपचाही आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. पण महायुती अन् मविआचं जागावाटप (maharashtra assembly election 2024) अद्याप पूर्ण झालेलं नाही. काही जागांवर पेच आहे. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी मागणी महायुतीमध्ये अजित पवारांकडून केली जात आहे. दुसरीकडे शिंदे १०० तर भाजप १५० जागांवर ठाम आहे. त्यामुळे महायुतीचं जागावाटप रखडल्याचे समजतेय. (2024 Maharashtra Legislative Assembly election)

महायुतीचं जागावाटप ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. भाजप १५५ जागा लढवण्यावर ठाण असल्याचे समजतेय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये जागावाटप करताना भाजप १५५ पेक्षा जास्ता जागा लढण्यावर ठाम आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ६० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. दरम्यान, मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या त्यांचे आमदार असलेल्या जागांच्या व्यतिरिक्त जास्त जागांच्या मगणीबद्दल भाजपकडून संबंधीत मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार कोणते? याबाबात विचारणा केली जाणार असल्याची माहिती भाजपमधील सुत्रांने दिली.

Maharashtra Election
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत वादाचे फटाके, ३८ जागांवर उडाली ठिणगी, आपापसातच लढणार?

"सीटिंग आमदार असलेल्या जागा व्यतिरिक्त जागा हवी असल्यास जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार सांगा मगच मतदारसंघ घ्या" अशी विचारणा करण्याची भाजपची स्ट्रेटेजी असल्याचे सूत्राने सांगितले. एकनाथ शिंदे यांनी १०० जागांची मागणी केली आहे. अजित पवार यांनीही ६० त ६५ जागा मागितल्या आहेत. तर भाजप १५५ पेक्षा जास्त जागा लढवण्यावर ठाम आहे, त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात कुणाला किती जागा? मिळतात याकडे लक्ष लागलेय.

कोकणात भाजप नमते घेणार?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नमतं घेणार असल्याचं समजतेय. दोन्ही जिल्ह्यात भाजप फक्त 1 जागा लढवण्याची शक्यता असल्याचं समोर आलेय. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप एकही जागा लढवणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे शिवसेना चार, तर चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार आहे. तर सिंधुदुर्गमध्ये 1 जागा भाजप लढवणार, 2 जागा शिंदेंची शिवसेना लढवणार आहे. निलेश राणे शिवसेनेतून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत यश मिळूनही भाजप एक पाऊल मागे जात असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे.

Maharashtra Election
Maharashtra Politics: अजित पवारांचा मतदारसंघ ठरला! प्रफुल पटेलांनी केली उमेदवारीची घोषणा; महायुतीचे २३५ उमेदवारही 'या' दिवशी ठरणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com