v
Mva Seat Sharing Formula for MaharashtraSaam Tv

MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत वादाचे फटाके, ३८ जागांवर उडाली ठिणगी, आपापसातच लढणार?

Maharashtra Assembly Election Political News Updates: : विधानसभा निवडणुकीआधी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहचले आहे.
Published on

MVA friendly fight for 38 Seats: कोणत्याही क्षणी राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्याचा आढावा घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यात जोरदार तयारी सुरुवात झाली आहे. २८८ जागांवरील उमेदवार ठरवण्यासाठी युती आणि आघाडीमध्ये बैठकांवर बैठका होत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपामुळे काही प्रमाणात बिघाडी झाल्याचं समोर आलेय.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) या तिन्ही पक्षामध्ये जागावाटपावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतील जागांवरुन बैठकांवर बैठका सुरु आहे. पण मविआमध्ये काही जागांवर एकमत झालेय, पण ३८ जागांवर मतभेद असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ३८ जागांवर तोडगा (MVA friendly fight for 38 Seats) निघण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मविआमध्ये बिघाडी होणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय.

v
Maharashtra Election : विधानसभेसाठी भाजपचा मास्टरप्लान, राजस्थान पॅटर्न वापरणार, बावनकुळेंकडे पाकिटं येणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८८ जागांपैकी जवळपास २५० जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले आहे. पण ३८ जागांवरचा तिढा कायम आहे. यावर तोडगा निघण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्या ३८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ३८ जागांमध्ये काही ठिकाणी दोन पक्ष तर काही ठिकाणी तीन पक्षांनी आपला ठोकला आहे. अशा परिस्थितीत या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

निवडणुका कधी होणार ?

२६ नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपणार आहे. त्याआधीच राज्यात विधानसभा निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केलेय.

त्यातच गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने राज्यात आढावा घेतला आहे. कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते.

१० ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात एका टप्प्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होतील, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते.

v
BRS Party : महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, अख्खा बीआरएस पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com