Sanjay Raut News: 'काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर..' संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान; हरियाणा निकालावरुन साधला निशाणा

Maharashtra Assembly Election 2024: हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे, त्यातून बरेच काही शिकता आले. कोणी कोणाला मोठा भाऊ छोटा भाऊ समजत नाही लोकसभेतला यश हे इंडिया आघाडीतले यश आहे, असं संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut News: 'काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर..' संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान; हरियाणा निकालावरुन साधला निशाणा
Sanjay RautSaam Tv
Published On

मयुर राणे, मुंबई

दोन राज्यांच्या निवडणुका पार पडल्या जम्मू काश्मीर हे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे राज्य आहे. ३७० कलम हटवणे हा निवडणुकीचा प्रचाराचा एक भाग होता, तिथे भाजपचा पराभव झाला. दुसरीकडे हरियाणामधील पराभव दुर्देवी आहे, पण अजून बरेच काही शिकता आले, असे म्हणत संजय राऊत यांनी दोन राज्यांमधील निवडणुकांच्या निकालावरुन प्रतिक्रिया दिली. तसेच हरियाणामधील निकालाचा महाराष्ट्रात काहीही परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"हरियाणाचा विजय फार मोठा महान विजय नाही. ठिकठिकाणी अपक्षांनी मत घेतली. जो जिंकतो सिकंदर अशी हिंदीमध्ये म्हण आहे. देवेंद्र फडणवीस हरियाणामध्ये गेले आणि विजय प्राप्त झाला असं काही होत नाही. मात्र काँग्रेस पक्षाला आता एक भूमिका घ्यावी लागेल स्वबळावर लढायचे असेल तर तशी त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे, त्यातून बरेच काही शिकता आले. कोणी कोणाला मोठा भाऊ छोटा भाऊ समजत नाही लोकसभेतला यश हे इंडिया आघाडीतले यश आहे, असं संजय राऊत म्हणाले.

"हरियाणा निकालातला कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. जम्मू काश्मीर निवडणुकीत ओमर अब्दुल्ला हा चेहरा होता लोकांनी त्याला मतदान केले. माझा नेता कोण? माझे नेतृत्व कोण करणार? या राज्याचा चेहरा कोणता हे स्पष्ट करावे. एकनाथ शिंदे चेहरा नव्हता भाजपने जाहीर करावा आमचे तीन चेहरे आहेत फडणवीस शिंदे अजित पवार निवडणूक लढावी पण त्यांनी जाहीर करावं," असे आवाहनही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut News: 'काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर..' संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान; हरियाणा निकालावरुन साधला निशाणा
Maharashtra Politics: अजित पवारांचा मतदारसंघ ठरला! प्रफुल पटेलांनी केली उमेदवारीची घोषणा; महायुतीचे २३५ उमेदवारही 'या' दिवशी ठरणार

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचाही चांगलाच समाचार घेतला. फडणवीसांच्या पिपाण्या आहेत फडणवीस यांनी पिपाणी वाजून दाखवावी त्यांच्या तोंडातून फेस येईल. महाराष्ट्रातला भोंगा सकाळी नऊ वाजता लोक ऐकत आहेत. मराठी माणसाला कायम जागं ठेवलं. त्यांना मराठी माणसाचा इतिहास माहित नाही त्यांनी इतिहास समजून घ्यावा. देवेंद्र फडणवीस बालबुद्धीचे नेते आहेत त्यांना संघाच्या इकडे काय वाचायला देत होते, अशी टीका संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut News: 'काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर..' संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान; हरियाणा निकालावरुन साधला निशाणा
Amravati Crime: एकाच तरुणावर दोघींचा जीव जडला! तरुणीने सपासप वार करुन दुसरीला संपवलं; बॉयफ्रेंडसाठी भयंकर कांड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com