PM Modi Thane Visit : PM नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; 56000 कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन, कसा असेल दौरा?

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून 56000 कोटींच्या विकासकांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात ठाणे दौरा महत्त्वाचा असणार आहे.
PM Modi Thane Visit
PM Modi Thane VisitSaam Digital
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून कोट्यवधी रुपयांच्या विकासकांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात ठाणे दौरा महत्त्वाचा असणार आहे कारण, ठाण्यातील 32,800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत,या प्रकल्पांमध्ये ठाणे मेट्रोचाही समावेश आहे. ठाण्यात ते कसारवली भागातील वालावलकर मैदानावरील रॅलीला संबोधित करणार आहेत. वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ आणि बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुंबईतील या प्रकल्पांचं उद्घाटन

मुंबई मेट्रो लाईन 3 फेज - 1 च्या आरे JVLR ते BKC विभागाचे पंतप्रधान उद्घाटन

ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्ताराची पायाभरणी

पंतप्रधान नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्पाची पायाभरणी करणार

कसं आहे दौऱ्याचं नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते वाशिम येथे प्रयाण करतील आणि सकाळी 11.15 वाजता जगदंबा माता मंदिर, पोहरादेवी येथे दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 वाजता, पंतप्रधान बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील.

PM Modi Thane Visit
Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या नांग्या ठेचणार, रोहीत पवारांची जहरी टीका

दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी 4 वाजता, पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता, बीकेसी मेट्रो स्टेशनवरून, ते बीकेसी ते आरे जेव्हीएलआर, मुंबईकडे धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान ते मेट्रोमध्येही प्रवास करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या लाईनच्या उद्घाटनासाठी ठाण्यात येत आहेत. ८ डब्यांची मेट्रो चालवणारी भारतातील ही पहिली लाईन ठरणार असून महिलांसाठीही विशेष डब्याची सोय करण्यात आली आहे. दिल्लीत ८ डब्यांच्या मेट्रो चालवल्या जात असल्या तरी त्यांची लांबी कमी असल्यामुळे सध्या या प्रकल्पाची देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

PM Modi Thane Visit
Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या नांग्या ठेचणार, रोहीत पवारांची जहरी टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com