Maharashtra Politics Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवारांची हर्षवर्धन पाटलांशी बंद दाराआड चर्चा, विवेक कोल्हेंसोबत एकत्र प्रवास, पुण्यात मोठ्या घडामोडी; महायुतीचं टेन्शन वाढलं?

Maharashtra Politics Latest News: पुण्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीने आणि शरद पवारांच्या राजकीय खेळीने महायुतीचे टेन्शन मात्र चांगलेच वाढण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर| पुणे, ता. २७ ऑगस्ट २०२४

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या आधी अनेकजण शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. अशातच आज पुण्यामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या असून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. एकीकडे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग!

पुण्यामधील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आज पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, माढ्याचे आमदार बबन शिंदे, राजेश टोपे, नगरचे विवेक कोल्हे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

भाजपच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षात सामील होण्याच्या चर्चा असल्याने या दोन्ही नेत्यांमधील बैठक महत्वाची मानली जात आहे. दुसरीकडे नगरचे भाजप नेते आणि विधानसभेला तुतारी हाती घेण्यास इच्छुक असलेले विवेक कोल्हे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी विवेक कोल्हेंना गाडी बसण्याची सूचना देत एकत्रित प्रवासही केला. पुण्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीने आणि शरद पवारांच्या राजकीय खेळीने महायुतीचे टेन्शन मात्र चांगलेच वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका अन् शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर महत्वाचे विधान केले. शरद पवार यांच्याबरोबर दोन अडीच तास होतो. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या विषयांवर चर्चा झाली, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

"विधानसभा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीवेळी जी चर्चा झाली जे आश्वासन देण्यात आलं होतं त्यावर अद्याप चर्चा नाही. हर्षवर्धन पाटील आणि इंदापुर बाबत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं मला लोकसभा निवडणुकीवेळी अजितदादानी सांगितलं होते. ⁠देवेंद्र फडणवीस यांनीही इंदापुरबाबत मी योग्य निर्णय घेऊल असं आश्वासन दिले आहे. त्यामुळे याबाबत निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत," असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT