मुलं खेळता खेळता काय करतील त्याचा नेम नाही. पालकही मुलांसमोर खेळणी टाकून आपलं काम करण्यात दंग असतात. मात्र हे कधी जीवावर बेतत... जळगावमधील ही घटना पाहा... गवंडी काम करणारे सानियाचे वडील सकाळीच घराबाहेर पडले होते. आईचीही घरात कामाची लगबग सुरु होती. याचवेळी खेळता-खेळता अडीच वर्षाच्या सानियानं अॅल्युमिनीयमचं भांडं मुकूट म्हणून डोक्यात घातलं. आणि मग सुरु झाली सगळ्यांचीच तगमग...खूप प्रयत्न करुनही भांडं निघालं नाही. तेल लाव आणखी काही लाव पण भांडं घट्टपणे चिमुरडीच्या तोंडावर अडकलं होतं. डोळ्यादेखत मुलीचा श्वास गुदमरत असलेला पाहून आई-वडीलांनी आक्रोश करत रुग्णालय गाठलं.
डॉ. मीनाज पटेल यांच्या मदतीला त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्लंबर खालीद शेख धावून आला....ज्या हातांनी २० वर्षे नळ आणि पाइप दुरुस्त केले. त्याच हातांनी चिमुरडीचा श्वास मोकळा करायचा होता. तिचा जीव वाचवायचा होता. भांड डोक्यावरुन निघताच काळजाच्या तुकड्याची तडफड पाहणा-या सानियाच्या आई-वडीलांना अश्रू अनावर झाले.
सानियाचा जीव वाचला...पण जीवन-मृत्यू सोबतचा 25 मिनिटांचा हा थरार अस्वस्थ करतो. त्यामुळे सर्वच पालकांनी सावध रहायला हवं... डोळ्यात तेल घालून लहान मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे. कारण खेळता-खेळता मुलांबाबत अशा प्रकारची घटना कधीही घडू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.