Cm Devendra Fadnavis On Samvidhan Saam Tv
मुंबई/पुणे

Mahaparinirvan Din 2024: धर्मग्रंथापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Cm Devendra Fadnavis On Samvidhan: देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा उल्लेख करत धर्मग्रंथापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचा असेल असे मत व्यक्त केले.

Priya More

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिणिर्वाण दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपालांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा उल्लेख करत धर्मग्रंथापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचा असेल असे मत व्यक्त केले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात संविधान मंदिर बांधणार आहोत आणि त्याचं काम सुरू असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'आज आपला देश वेगाने प्रगती करत आहे. जगातील पाचवी अर्थव्यवस्था भारत झाला आहे. याचं सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. संविधान लिहिलं त्याचं आहे. जगाच्या पाठीवर भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. कुठली समस्या देशासमोर असली तरी त्याचा निदान आणि उपाय भारताचे संविधान हेच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृष्टे होते. बाबासाहेबांना समतेचा बंधुतेचा एक संदेश दिला. तो संदेश देखील महत्वाचा आहे.'

'धर्मग्रंथापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचा असेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना मी पुन्हा एकदा आमचा संकल्प जाहीर करतो की जे कार्य आम्ही करू ते संविधान अनुप करू आणि काम करत असताना समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे जो वंचित आहे त्या वंचिताचा विचार हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल.'

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'सामान्य कुटुंबातील नागरिक पंतप्रधान होऊ शकतो, महिला राष्ट्रपती होऊ शकते हे संविधानामुळेच होऊ शकतात. बाबासाहेबांचे संविधान सत्ताधाऱ्यांना जागृत ठेवतं. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांसाठी केला. आपल्या सरकारने दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला. दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालाय त्याचे सर्व श्रेय बाबासाहेबांना जातो. संविधानाचा सर्वाधिक सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झाला. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात आम्ही संविधान मंदिर बांधणार आहोत. त्याचं काम सुरू आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT