CM Devendra Fadanvis: मुकेश अंबानी ते सलमान खान..मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला कोण - कोण आलं?

Shah Rukh and Salman Attend Maharashtra Oath Ceremony: नेत्यांसह दिग्गज कलाकारांची दिमाखदार एन्ट्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविशी सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांची पाहा ग्लॅमरस एन्ट्री
CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis SAAM TV
Published On

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. आझाद मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा झाला. या शपथविधी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील नेते, तसेच उद्योगपती उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त अनेक सिनेकलाकारांनी दिमाखदार एन्ट्री केली. मुख्य म्हणजे बॉलिवूडचे खान अर्थात सलमान आणि शाहरूख खान यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधी सोहळ्याची चर्चा देशभरात झाली. या सोहळ्यात हजर असलेल्या बॉलिवूडच्या सुपरस्टार कलाकारांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्यात सलमान खान आणि शाहरुख यांनी एन्ट्री केली. दोघे समोरासमोर येताच एकमेकांना अलिंगन दिलं. रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एकमेकांना भेटले. माधुरी दीक्षित, पती श्रीराम नेनेसोबत उपस्थित राहिली. तर विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत दिसली.

याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, रामदास आठवले, निर्मला सीतारामन यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. याव्यतिरिक्त क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह उपस्थित होता. रिलायन्स इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, त्यांचा मुलगा अनंत यांच्यासमवेत कुटुंबीय, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हे देखील उपस्थित होते. यासह इतरही दिग्गज व्यक्तीही उपस्थित होत्या.

CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस : मॉडेल ते रोल मॉडेल

शपथविधी सोहळ्याला विरोधकांची अनुपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर झाला. यावेळी दिग्गज नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. मात्र या सोहळ्याला महाविकास आघाडीतील एकाही प्रमुख नेत्यानं उपस्थिती लावली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील अनुपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत असल्यानं ते येऊ शकले नाहीत. तसेच उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेतेही या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com