
पुणे : देशातील जुना आणि महगडा द्रुतगती मार्ग म्हणजे मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग. दोन शहरांना जोडणारा हा मार्ग नेहमी गजबजलेला असतो. यासह महामार्गातून प्रवास करण्यासाठी टोलची तितकीच चर्चा होते. मुंबई - पुणे महामार्ग तसा फार जुना. 2002 साली म्हणजेच 22 वर्षांपूर्वी या एक्सप्रेस वेची पायाभरणी झाली होती. पण या एक्सप्रेस वेतून प्रवास करण्यासाठी नक्की किती टोल भरावे लागते? टोलसाठी अकरण्यात येणाऱ्या रकमेमध्ये काही बदल घडलेत का? कोणत्या वाहनांना किती टोल भरावा लागतो?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढतो. तर दर 3 वर्षानी 18 टक्क्यांनी वाढतो. शेवटचा बदल एप्रिल 2023 साली झाला होता. अधिकृत माहितीनुसार, पुढील टोल सुधारणा 2026 साली होणार आहे. जे काही दरात बदल घडतील, ते बदल 2030 पर्यंत प्रवाशांना लागू होणार आहे.
गेल्या वर्षी कार म्हणजेच चारचाकीचा टोल 270 रुपयांवरुन 320 करण्यात आले होते. या व्यतिरिक्त मिनीबस आणि टेम्पो बस 420 पासून 495 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर, अवजड वाहनांसाठी टोल 685 करण्यात येत आहे. जे पूर्वी 585 रुपये इतके टोल आकरण्यात येत होते. यासह बसेस जे 787 टोल भरायचे आता त्यांना 940 भरावे लागत आहे.
2002 सालापासून सामन्यांच्या सेवेत मुंबई - पुणे एक्सप्रेस वे सज्ज आहे. हा द्रुतगती मार्ग नवी मुंबईतील कळंबोली ते पुण्यातील किवळेपर्यंत जातो. या एक्स्प्रेस वे मुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अडीच तासावर आला आहे. हा द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधला आहे.
या महामार्गाच्या उभारणीत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा मोठा वाटा आहे. हा द्रुतगती महामार्ग उभारण्यासाठी एकूण 1,630 कोटी खर्च झाला असल्याचं अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये स्पष्ट झाले आहे. हा एक्सप्रेस वे साधारण 94.5 किमी अंतर गाठते. ज्यामुळे मुंबई ते पुण्यातील अंतर गाठणे सोयीस्कर होते.
या एक्सप्रेस वेवर 2 कॅरजवे आहेत. प्रत्येकी ३ काँक्रीट लेन असून, एकूण ६ बोगदे आहेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना प्रवाश्यांना स्वर्गसुखाची अनुभूती मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.