Pune Crime : लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या अमिषाने फसवणूक, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana Fruad: लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याच्या बतावणीने चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
Maharashtra  Crime
Maharashtra CrimeSaam tv
Published On

लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याची बतावणी करून चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास हडपसर भागात हा प्रकार घडला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत.

गुरुवारी त्या सकाळी ११च्या सुमारास हडपसर भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. आमचे साहेब लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करत आहेत असे सांगितले.

Maharashtra  Crime
PMPML Bus: पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल, १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले आणि मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने चोरले. त्यानंतर चोरटा पसार झाला. या प्रकरणी हडपसर पोलास अधिक तपास करत आहेत.

Maharashtra  Crime
Ahmednagar News: शिव्या द्याल तर 500 रुपये दंड; अहिल्यानगर जिल्ह्यात सौंदाळा ग्रामपंचायतचा निर्णय

शहरात मोफत साडी, पैसे वाटप करण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. स्वारगेट भागात चोरट्यांनी एका महिलेकडील ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली.

Maharashtra  Crime
Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com