Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड

Maharashtra Political News: भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निवड करण्यात आली.
Devendra Fadnavis: भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस, कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
Devendra Fadnavis Saam TV
Published On

राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. नुकताच भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आली. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. नुकताच पार पडललेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व आमदारांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती देत त्यांची निवड केली.

भाजपची कोअर कमिटीची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निवड करण्यात आली. केंद्रातून आलेल्या दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत आज विधिमंडळ बैठकीपूर्वी कोर कमिटीची ही बैठक पार पडली. त्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक पार पडत आहे. पक्षाकडून नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या प्रत्येक आमदाराच्या डोक्यावर भगवे फेटे बांधण्यात आले.

Devendra Fadnavis: भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस, कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
Maharashta Politics: कॉंग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

आमदारांच्या या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्तावा मांडण्यात आला आणि अधिकृत घोषणा करण्यात आली. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी सर्व आमदारांनी एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात नाचत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Devendra Fadnavis: भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस, कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
Maharashta Rain Update: पुढचे चार दिवस महत्वाचे, कोकणासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या ठरावाला पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, यांच्यासह इतर भाजपच्या नवनिर्वाचित आमदरांनी अनुमोदन केले आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस हेच आता राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्या सायंकाळी ५ वाजाता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Devendra Fadnavis: भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस, कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
Maharashta Election 2024: सांगलीच्या जागेचा तिढा मिटला; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com