Maharashta Politics: कॉंग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Raju Waghmare Join Shinde Group: ऐन निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने शिंदे गटामध्ये आज प्रवेश केला आहे.
Maharashta Politics
Maharashta PoliticsSaam Tv
Published On

विकास काटे साम टीव्ही, मुंबई

Maharashta Politics Lok Sabha Election 2024

कॉँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare Join Shinde) यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या (congress) एका मोठ्या नेत्याने शिंदे गटामध्ये आज प्रवेश केल आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. (Maharashtra Lok sabha Election)

आता शिंदे गटामध्ये राजू वाघमारे यांना मुख्य सहप्रवक्ते अणि उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत कॉंग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांनी (Maharashta Politics) शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचं गाळप होण्याची प्रक्रिया सुरूच आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता राजू वाघमारे यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला आहे. शिंदे गटामध्ये त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली (Lok Sabha Election 2024) आहे. अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत आहेत. आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. राजू वाघमारे प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची बाजू रोखठोकपणे मांडत होते. पण लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच त्यांनी पक्षाची साथ (Lok Sabha) सोडली आहे.

Maharashta Politics
Maharashtra Politics 2024 : काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा वादाची शक्यता; सांगलीनंतर मुंबईतही ठाकरे गट देणार काँग्रेसच्या जागेवर उमेदवार?

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केल्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं (Maharashtra Election) आहे. काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. दीर्घकाळापासून राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते होते. त्यांनी माध्यमांसमोर पक्षाची भूमिका अनेकदा परखडपणे जाहीर केली होती. अशातच आता वाघमारेंनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

Maharashta Politics
Maharashtra Politics 2024 : माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश; हेमंत गोडसेंच्या समर्थनात घोषणाबाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com