Maharashta Election 2024: सांगलीच्या जागेचा तिढा मिटला; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल

Sangli Lok Sabha Constituency News: महाविकास आघाडीचा सांगलीच्या जागेचा तिढा मिटला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.
Maharashta Election 2024: सांगलीच्या जागेचा तिढा मिटला; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल
MVA Seat Sharing: Sangli Lok Sabha Constituency MVA Candidate Will Be Chandrahar PatilSaam Tv
Published On

Maharashta Lok Sabha Election 2024

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (MVA Seat Sharing) सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही जागा वाटपावरुन वाद सुरू होता. शिवालय कार्यालयात आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आहे. यामध्ये आता सांगलीच्या जागेचा (Sangli Lok Sabha Constituency) तिढा मिटला आहे. आता सांगलीमधून महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील (MVA Candidate Chandrahar Patil) यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.  (Maharashtra Lok sabha Election)

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील निवडणूक (Maharashta Election) लढवणार आहे. या जागेसाठी कॉंग्रेस देखील आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. अखेर या जागेचा तिढा मिटला असून ही जागा ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashta Election 2024: सांगलीच्या जागेचा तिढा मिटला; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल
Maharashtra Politics 2024 : माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश; हेमंत गोडसेंच्या समर्थनात घोषणाबाजी

लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. शिवसेनेला एकवीस जागा, कॉंग्रेसला १७ जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दहा जागा वाटप करण्यात आलं ( Lok Sabha Election 2024) आहे. सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील दोघेही आग्रही होते. दोघांपैकी कुणाला जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

सांगलीच्या जागेवर अनेकदा कॉंग्रेसने दावा केल्याचं समोर आलं होतं. परंतु आता सांगली लोकसभेची माळ चंद्रहार पाटलांच्या (Chandrahar Patil) गळ्यात पडली आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल संजय राऊत यांच्यासोबत चंद्रहार पाटील मुंबईला देखील गेल्याचं (Lok Sabha) समोर आलं होतं. महाविकास आघाडीचा सांगलीच्या जागेचा तिढा मिटला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.

Maharashta Election 2024: सांगलीच्या जागेचा तिढा मिटला; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल
Maharashtra Politics 2024 : काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा वादाची शक्यता; सांगलीनंतर मुंबईतही ठाकरे गट देणार काँग्रेसच्या जागेवर उमेदवार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com