Vivek Weekly On BJP Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भाजप कार्यकर्ता खचलेला नाही, संभ्रमात, संघ विचारांच्या साप्ताहिकात परखड भाष्य; भाजपची पहिली प्रतिक्रिया काय? VIDEO

Priya More

संघाचे विचार असलेल्या साप्ताहिक विवेकमध्ये भाजपमधील परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. 'हिंदुत्व मानणारा भाजपचा कार्यकर्ता खचलेला नाही तर हरवलेला आणि संभ्रमात आहे.', असे या साप्ताहिकामध्ये म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला खडेबोल सुनावले होते.

त्यानंतर आता संघाचे साप्ताहिक विवेकमध्ये देखील महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करण्यात आले आहे. या साप्ताहिकामध्ये पक्ष, कार्यकर्ते आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे लोकसभेला हा निकाल पहायला मिळाला असल्याची टीका देखील करण्यात आली आहे. या साप्ताहिकातील लेखावर आता भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रविण दरेकर यांनी सांगितले की, 'भाजपचे कार्यकर्ते परिपक्व आहेत. कार्यकर्त्यांनी अनेक चढउतार पाहिली आहे. म्हणून सलग तिसऱ्यांदा केंद्रात भाजपचं सरकार बनलं. विवेक साप्ताहिक आमचं मार्गदर्शक आहे. त्यांच्या सूचना असतील तर आम्ही काम करु. कार्यकर्ता काही कारणाने विचलित होतो. नैराश्य असलं तरी झटकन कार्यकर्ता कामाला लागला आहे. यावर अनेकदा काथ्याकूट झाला आहे.'

भाजपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती मान्य नाही, असे या विवेक साप्ताहिकामध्ये म्हटले आहे. हिंदुत्व हा सामायिक दुवा शिवसेनेसोबत युती करणे हे कार्यकर्त्यांनी स्वीकारले आहे. मात्र हिच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यावर टोकाला गेली. लोकसभेमुळे या नाराजीत भर पडली. कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण पण ते केवळ हिमनगाचे टोक. कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया जे भाजपाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे ती प्रक्रियाच पुढील काळात दुर्मिळ होत जाईल की काय अशी शंका कार्यकर्त्यांच्या मनात आहे.' असे म्हणत विवेक साप्ताहिकामध्ये अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.

अजित पवारांबद्दल बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, 'अजित पवारांवर आरोप झालेत. पण ते सिद्ध झाले नाहीत.' विवेक साप्ताहिकातील लेखानंतर विरोधकांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे. दरेकरांनी सांगितले की, 'शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. आई मुलांचं नातं भाजप आणि विरोधकांचं आहे. आपल्या अपत्याला मार्गदर्शन आई करते. तसंच संघाच्या बाबतीतही भाजपचं नातं कायम आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT