Shreya Maskar
करूळ घाट हा महाराष्ट्रातील सह्याद्री रांगेतील ११ किमी लांबीचा एक निसर्गरम्य पर्वतीय खिंड आहे, जो कोल्हापूरला कोकण प्रदेशाशी (वैभववाडीजवळ) जोडतो.
करूळ घाट चित्तथरारक, हिरवेगार लँडस्केप, उंच, वळणदार रस्ते आणि दरीच्या नेत्रदीपक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे भन्नाट रोड ट्रिप प्लान करू शकता.
करूळ घाटाची सफर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून करा. येथील थंडगार वातावरण अनुभवून तुमचा प्रवास सुखकर होईल.
करूळ घाटवर तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता. तसेच येथे सूर्यास्ताचा भन्नाट नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे सुट्टीत नक्की फेरफटका मारा.
करुळ घाट एक ११ किमी लांबीचा निसर्गरम्य घाट रस्ता आहे. गगनबावडा गावाजवळून सुरू होणारा हा घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून जातो.
हिरवीगार जंगले, धबधबे आणि निसर्ग सौंदर्याने करुळ घाट नटलेला आहे. पावसाळ्यात येथे असंख्य धबधबे दिसतात. येथील नजारा स्वर्गाहून सुंदर असतो.
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर आहे. येथे रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पन्हाळा किल्ला यांसारखी महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. येथील कोल्हापुरी चपल जगात प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.