NCP Party Symbol Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कोणाचं? आज होणार फैसला, सुप्रीम कोर्टात सुनावणी

NCP Party And Clock Symbol Hearing In Supreme Court: सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह याप्रकरणी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केलेली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कोणाचं?
NCP Party Symbol CaseSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय फैसला होणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका

शरद पवार गटाने मागील सुनावणीवेळी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचा दावा केला (NCP Party Symbol Case) होता. त्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेश दिले होते. कोर्टाचं कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे याप्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार (Ajit Pawar) आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतचा निर्णय

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने दिला होता. शरद पवार गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली (NCP Party And Clock Symbol ) होती. त्यांनी याचिका दाखल करत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय एकतर्फी असल्याचा दावा केला होता. यावर आता आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कोणाचं?
NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजितदादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?

सुप्रीम कोर्टात निर्णय होणार

सोबतच, नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना अपात्र न केल्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधत दाखल केलेल्या याचिकेवरही आजच सुनावणी होणार (Sharad Pawar) आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने या प्रकरणी नोटीस जारी केली होती. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती भूयान यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी कोर्ट आज काही महत्त्वाचे दिशा निर्देश देत का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कोणाचं?
NCP Melava Baramati: साहेबांना शह देण्यासाठी अजित 'दादांची' राष्ट्रवादी सज्ज! आज बारामतीत जनसन्मान मेळावा; विधानसभेचे रणशिंग फुंकणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com