NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजितदादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?

Maharashtra Politics Ajit Pawar Vs Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी चिन्हाचा मोठा फटका बसला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी' या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे.
NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजित दादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?
Ajit Pawar Sharad Pawar NCp Crisis SAAM TV
Published On

दिल्ली, ता. ८ जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी' या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी होणार असून आयोगाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजित दादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?
Pune News: मुंबईतील मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस रद्द; बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

तुतारा- पिपाणीच्या वादावर फैसला!

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी चिन्हाचा मोठा फटका बसला. शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह अन् अपक्ष उमेदवारांना दिलेले पिपाणी चिन्ह सारखेच दिसत असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. ज्याचा फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसला.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी' या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दोन्ही चिन्हे सामान्यतः 'तुतारी' म्हणून ओळखली जात आहेत, असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजित दादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?
Mumbai Crime News: संतापजनक! बारमध्ये हुक्का तपासणीला मॅनेजरचा विरोध, पोलीस शिपायाला शिवीगाळ करत केली मारहाण

नागालँडमधील आमदार अपात्रेवर सुनावणी

महाराष्ट्रानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नागालँड आमदार अपात्र प्रकरणी बाबत सुप्रीम कोर्टात गेला आहे. शरद पवार यांच्या पक्षाने अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या ७ आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं होत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या आमदारांना अपात्र केलं नव्हत.

त्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत त्या ७ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. आज उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर पहिल्याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी होणार आहेत. कोर्ट काही महत्वाचे निर्देश देत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजित दादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?
Maharashtra Rain Update: राज्यात कोसळधार! कोकणाला पावसाने झोडपलं, नदी-नाल्यांना पूर; शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

देणगी स्विकारण्यास परवानगी देण्याची मागणी

तसेच लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम २९ B नुसार राजकीय पक्ष म्हणून खाजगी व्यक्ती किंवा एखाद्या कंपनी, संस्थेकडून देणगी घेण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी शरद पवार गटाने केली आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित असल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आल्याने निवडणूक आयोगाने यावर तत्काळ निर्णय द्यावा, असे या याचिकेत म्हटले आहे. या दोन्हीं अर्जावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजित दादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?
Maharashtra Politics: ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार, राजू शिंदेंसह ६ माजी नगरसेवक ठाकरे गटात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com