Maharashtra Politics : आमचं प्रेम वेगळं, शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं; अजितदादांच्या आमदारांची कबुली

Maharashtra Political News : शरद पवार यांच्या पक्षातील एका खासदाराला दुसऱ्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी चक्क अजितदादा गटाच्या आमदाराने प्रयत्न केल्याचं समोर आलं.
आमचं प्रेम वेगळं, शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं; अजितदादांच्या आमदारांची कबुली
Ajit Pawar Sharad Pawar News SAAM TV
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही मावळ

अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांनी एकमेकांसमोर उमेदवार देखील उभे केले. यात शरद पवार यांच्या पक्षाने बाजी मारली. दुसरीकडे अनेक मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवारांचा पराभव झाला. त्यातच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मते आपल्याला मिळाली नाही, असा दावाही शिंदे-भाजपमधील काही पराभूत उमेदवारांनी केला.

आमचं प्रेम वेगळं, शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं; अजितदादांच्या आमदारांची कबुली
Maharashtra Politics : शिवसेना नेमकी कुणाची? आता लवकरच होणार फैसला; सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख ठरली!

इतकंच नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेऊ नका, अशी कुजबूज देखील महायुतीत सुरु झाली. त्यामुळे अजित पवार आता वेगळा निर्णय घेणार का? अशा चर्चा रंगल्या. अशातच शरद पवार यांच्या पक्षातील एका खासदाराला दुसऱ्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी चक्क अजितदादा गटाच्या आमदाराने प्रयत्न केल्याचं समोर आलं.

लोणावळा येथील कार्ला आई एकविरा देवी ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे या उभे होते. त्यांची या पदावर त्यांची वर्णी लागावी यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मैदानात उतरले होते.

या निवडणुकीत एकूण ७ सदस्यांमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेळके यांच्या ५ समर्थकांनी खासदार म्हात्रे यांना मतदान केलंय. तशी कबुली देखील आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. आम्ही स्वतंत्र पक्षात आहोत. मात्र, आमचे प्रेम वेगळे आहे. मी खासदार सुरेश म्हात्रे यांना शब्द दिला होता. तो पाळला, असं शेळके यांनी म्हटलंय.

इतकंच नाही, तर माझं नाव शरद पवारांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत आहे. तर मग त्यांना विचारा, मी कधी येऊ? अशी मिश्किल टिपणी ही शेळके यांनी खासदार म्हात्रें समोरचं केली आहे. यामुळे अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत का? अशा चर्चांनी जोर धरलाय. या विजयानंतर खासदार म्हात्रे यांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.

आमचं प्रेम वेगळं, शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं; अजितदादांच्या आमदारांची कबुली
Maharashtra Politics : विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती आखली; पहिलाच दणका भाजपला, तब्बल १६ नगरसेवक फुटणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com