Maharashtra Politics : विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती आखली; पहिलाच दणका भाजपला, तब्बल १६ नगरसेवक फुटणार?

Chhatrapatil Sambhajinagar BJP corporator : छत्रपती संभाजीनगर येथून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. भाजपचे तब्बल १६ नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती आखली; पहिलाच दणका भाजपला, तब्बल १६ नगरसेवक फुटणार?
Devendra Fadnavis on Uddhav ThackeraySaam tv
Published On

लोकसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरले असून त्यांनी पक्षउभारणीला सुरुवात केली आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर येथून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. भाजपचे तब्बल १६ नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

येत्या ७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे.

संजय शिरसाठ या मतदारसंघाती सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत ही जागा भाजपला मिळणे जवळपास अशक्य आहे. हीच बाब लक्षात घेता राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात (Uddhav Thackeray) प्रवेश करण्याचा निश्चिय केला आहे. लवकरच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती आखली; पहिलाच दणका भाजपला, तब्बल १६ नगरसेवक फुटणार?
Maharashtra Politics : मोदींनी कोट्यवधी लोकांना आळशी केलंय; फुकटात धान्य देणं म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाची टीका

राजू शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी ताकद आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे १६ आमदार देखील ठाकरे गटात प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या ७ जुलै रोजी राजू शिंदे आणि भाजपचे १६ नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील राजू शिंदे यांनी भाजपमध्ये बंडखोरी करीत विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) लढवली होती. त्यांना पक्षात घेऊन शिंदे गटात गेलेल्या संजय शिरसाट यांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गटाची रणनिती असल्याचं समजतंय. जर शिंदे आणि भाजपचे १६ नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं, तर मराठवाड्यात बसलेला हा भाजपला मोठा धक्का असेल.

विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती आखली; पहिलाच दणका भाजपला, तब्बल १६ नगरसेवक फुटणार?
Vidhan Sabha Election : मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com