Vidhan Sabha Election : मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

Mahayuti Vidhan Sabha Election : महायुती विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वाट्याला ८५ जागा येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुतीत एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
Rajya Sabha By Election 2024:Saam Tv

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही मित्रपक्षांनी पुन्हा एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे महायुती देखील विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासाठी लवकरच जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे.

सूत्रांच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वाट्याला ८५ जागा येणार आहेत. तशी माहिती देखील अजित पवार यांनी आपल्या पक्षातील आमदारांना दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील सर्वच आमदारांची उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीत (vidhan Sabha Election) आपल्याला एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. जागावाटप लवकरच होईल. अशी माहिती अजित पवार यांनी आमदारांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर मित्रपक्षासोबतची वादग्रस्त विधान टाळा. त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवा, अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील आमदारांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान, लोकसभेची निवडणूक महायुतीने एकत्रित लढवली होती. या निवडणुकीत ४८ पैकी केवळ १७ जागांवरच महायुतीचे उमेदवार निवडून आले होते.

मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुतीत एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंनी टोचले आमदारांचे कान; 'सह्याद्री'वरील बैठकीत काय सूचना दिल्या? पाहा VIDEO

यामध्ये भाजपचे ९, शिवसेना शिंदे (Eknath Shinde) गटाचे ७ आणि अजित पवार गटाला फक्त एका जागेवरच यश मिळाले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत वादाचे फटाकेही फुटल्याचं समोर आलं होतं. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळेच भाजपचं नुकसान झालं, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून करण्यात आली होती.

दुसरीकडे शिंदे गटातील काही पराभूत उमेदवारांनी अजित पवार यांच्यामुळे निवडणुकीत अपयश आल्याचं विधान केलं होतं. यावरून अजित पवार हे महायुतीत राहणार की विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकही महायुती एकत्रित लढणार आहे.

मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुतीत एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
Maharashtra Politics : काळाने घेतलेला हा सूड, यापेक्षाही वाईट दिवस पाहावे लागतील; ठाकरे गटाचा PM मोदींना चिमटा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com