Maharashtra Politics : काळाने घेतलेला हा सूड, यापेक्षाही वाईट दिवस पाहावे लागतील; ठाकरे गटाचा PM मोदींना चिमटा

Maharashtra Political News : राहुल गांधी यांनी संसदेतील भाषणातून हल्लाबोल केला. त्यांच्या या भाषणाचं शिवसेना ठाकरे गटाने तोंडभरून कौतुक केलंय. ‘एक अकेला’ राहुल गांधी या सगळय़ांवर भारी पडले, असं सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलंय.
Maharashtra Politics : काळाने घेतलेला हा सूड, यापेक्षाही वाईट दिवस पाहावे लागतील; ठाकरे गटाचा PM मोदींना चिमटा
Uddhav Thackeray On India Aghadi PMSaam TV
Published On

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेतील भाषणातून भाजपवर जहरी टीका केली.भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा आणि हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या भाषणाचं शिवसेना ठाकरे गटाने तोंडभरून कौतुक केलंय. ‘एक अकेला’ राहुल गांधी या सगळय़ांवर भारी पडले, असं सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलंय.

Maharashtra Politics : काळाने घेतलेला हा सूड, यापेक्षाही वाईट दिवस पाहावे लागतील; ठाकरे गटाचा PM मोदींना चिमटा
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंनी टोचले आमदारांचे कान; 'सह्याद्री'वरील बैठकीत काय सूचना दिल्या? पाहा VIDEO

"मोदी–शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचे काम राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदी–शहा घाबरवत राहिले. आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या, अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकाऱ्यांवर आली. काळाने घेतलेला हा सूड आहे", अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.

मोदी–शहांना (Narendra Modi Amit Shah) यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहेत. गांधी यांना थांबवणे आता सोपे नाही. ईडी, सीबीआयला हा संदेश एव्हाना गेलाच असेल. याबद्दल गांधी यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या देवत्वाचा शेंदूर खरवडून काढला, असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.

"राहुल गांधी भाषण करत असताना मोदी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मोदी-शहांच्या मैदानात शिरून त्यांना अशा पद्धतीने कोणीच सुनावले नव्हते. दहशत व पाशवी बहुमताच्या बळावर या जोडगोळीने संसद आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत अवतरताच हिंदुत्वाच्या नावावर मनमानी करणाऱ्यांचा टांगा पलटी झाला आहे", असा टोमणा सामनातून लगावला.

"मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढायची होती. यासाठी त्यांनी तीन कंपन्यांना सर्व्हेचे काम दिले. तिघांनीही मोदींना निर्णय दिला की, मोदीजी तुम्ही रामाच्या वाटेला जाऊ नका. अयोध्येतील जनता हरवेल. तेव्हा मोदी पुन्हा वाराणसीत गेले व कसेबसे जिंकले", असं राहुल गांधी यांनी आपल्या संसदेतील भाषणातून म्हटलं. याच विधानाचं समर्थन करत मोदी यांच्या तोंडावर इतकी फजिती कोणीच केली नसेल, असा चिमटा सामना अग्रलेखातून काढण्यात आला.

Maharashtra Politics : काळाने घेतलेला हा सूड, यापेक्षाही वाईट दिवस पाहावे लागतील; ठाकरे गटाचा PM मोदींना चिमटा
Manoj Jarange Warning : ड्रोन टप्प्यात येऊ द्या, एका गोट्यातच खाली पाडतो; मनोज जरांगे खवळले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com