Manoj Jarange Warning : ड्रोन टप्प्यात येऊ द्या, एका गोट्यातच खाली पाडतो; मनोज जरांगे खवळले

Antarwali Sarati News : ड्रोन टप्प्यातच येत नाही, एका गोट्यातच त्याला खाली पाडणार, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
Manoj Jarange Warning
Manoj Jarange WarningSaam TV

मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलं आहे. तशी तक्रार ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. नेमकी कुणाकडून गावाची रेकी केली जातेय असा प्रश्न पोलिसांनाही पडलाय. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange Warning
Manoj Jarange News: मनोज जरांगेंवर कुणाची पाळत? अंतरवाली सराटीत मध्यरात्री ड्रोनच्या घिरट्या, पाहा VIDEO

मनोज जरांगे आज जालना येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अंतरवाली सराटी येथे ड्रोन घिरट्या घातल आहेत. तुमच्या जिवाला धोका आहे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांनी जरांगे यांना विचारला. यावर उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, मला मारणे एवढे सोपे नाही. माझ्या मागे राज्यातील ६ कोटी मराठा बांधव आहेत.

"जो कुणी ड्रोन उडवून हे काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने आमच्या नादाला लागू नये. ड्रोन आले होते. ते खूपच उंचावर होतं. ड्रोन टप्प्यातच येत नाही, एका गोट्यातच त्याला खाली पाडणार, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. तुम्ही मला विकत घेऊ शकत नाहीत", असंही जरांगे म्हणाले.

"मी मॅनेज होणारा नाही. मराठा समाज एक झाल्याने काही लोकांची पोटं दुखत आहेत. कितीही झाकलं तरी ते उघडं पडतंच. मी कोणाला घाबरत नाही. माझा रस्ता क्लिअर असून मनात कपट नाहीये. मराठा समाजाला टक्कर देण्याचं काम कुणीच करू नये". त्यांच्यासाठी मी मरायला पण तयार आहे, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "मराठा समाजात असा मेसेज गेलाय, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्याला लढून मिळवावे लागणार आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. जर ओबीसी समाज ताकदीने एकत्र येऊ शकतो तर आता मराठ्यांनी या शांतता रॅलीत एकत्र यावे".

Manoj Jarange Warning
Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत तगडी फाईट होणार; उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, महायुतीची धाकधूक वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com