Mumbai Crime News: संतापजनक! बारमध्ये हुक्का तपासणीला मॅनेजरचा विरोध, पोलीस शिपायाला शिवीगाळ करत केली मारहाण

Andheri Crime News: मुंबईत बार अँड रेस्ट्रॉरंटमधील हुक्का तपासणीला विरोध करुन पोलीस शिपायाला शिवीगाळ व मारहाण झाल्याचे खळबळ जनक घटना घडली आहे.
संतापजनक! बारमध्ये हुक्का तपासणीला मॅनेजरचा विरोध, पोलीस शिपायाला शिवीगाळ करत केली मारहाण
Amboli Police StationSaam Tv

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

बार अँड रेस्ट्रॉरंटमधील हुक्का तपासणीला विरोध करुन पोलीस शिपायाला शिवीगाळ व मारहाण झाल्याचे खळबळ जनक घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरातील लिटील डोअर हॉटेल अँड बारमध्ये ही मारहाणीची घटना घडली. पबमध्ये अवैधपणे हुक्का विक्री होत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस कर्मचारी समाधान बापूराव पाटील हे पाहणी करण्यासाठी गेले असता बार मॅनेजर जॉएल नॉरबट फर्नाडिस याने शिवीगाळ करत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाखाली लगावली.

याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच जॉएल नॉरबट फर्नाडिस या आरोपी मॅनेजरला आंबोली पोलिसांनी अटक केली. आरोपीला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

संतापजनक! बारमध्ये हुक्का तपासणीला मॅनेजरचा विरोध, पोलीस शिपायाला शिवीगाळ करत केली मारहाण
Rahul Gandhi: राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला येणार? शरद पवारांच्या भेटीत महत्त्वाची चर्चा, काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून मुंबई शहर आणि उपनगरात अवैधपणे सुरू असलेल्या बार आणि हुक्का पार्लरवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरातील लिटिल डोर बार अँड रेस्टॉरंट मध्ये अवैधपणे हुक्का विक्री होत असल्याबाबतची तक्रार आंबोली पोलिसांकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार रविवारी रात्री उशिरा अकरा वाजता आंबोली पोलिसांचे एक विशेष पथक लिटील डोअर हॉटेल ऍण्ड बारमध्ये गेले. मात्र बारचा मॅनेजर जॉएल नॉरबट फर्नाडिस याने पोलीस कर्मचारी समाधान पाटील यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच त्यांना कानाखाली देखील लगावली.

बारची तपासणी करण्यास आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बारची तपासणी करून न देता गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे बार मॅनेजरकडून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बार मॅनेजरने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाखाली मारली. या प्रकारानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी जॉएलला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

संतापजनक! बारमध्ये हुक्का तपासणीला मॅनेजरचा विरोध, पोलीस शिपायाला शिवीगाळ करत केली मारहाण
PM Modi Video: 'बालकबुद्धी', राहुल गांधींच्या भाषणावर PM मोदींचा टोमणा; इंडिया आघाडीवरही हल्लाबोल

याप्रकरणी समाधान पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जॉएलविरुद्ध ३५३, ३२३, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com