Maharashtra Politics: ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार, राजू शिंदेंसह ६ माजी नगरसेवक ठाकरे गटात

Raju Shinde Join Thackeray Group In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. राजू शिंदेंसह ६ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश आज केलाय.
भाजपला मोठं खिंडार
Raju Shinde Join Thackeray Group Saam Tv
Published On

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठा धक्का भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलाय. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजीव शिंदे यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे. त्यांच्यासोबतच भाजपच्या इतर सहा माजी नगरसेवकांनी देखील आज ठाकरे गटात प्रवेश केलाय.

राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश

राजीव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शाल घालून स्वागत केलेलं (Raju Shinde Join Thackeray Group) आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राजीव शिंदेंनी हाती भगवा घेतलाय. राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचा शिव संकल्प मेळावा पार पडला.

उद्धव ठाकरेंचा आजचा छत्रपती संभाजीनगर दौरा

या शिव संकल्प मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंचा आजचा छत्रपती संभाजीनगर यांचा दौरा महत्त्वाचा (Chhatrapati Sambhajinagar News) ठरलाय. माजी उपमहापौर राजीव शिंदे यांच्यासह अनेकांचे आज ठाकरे गटात पक्षप्रवेश झालाय. विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात इन्कमिंग सुरू झाल्याचं दिसतंय.

भाजपला मोठं खिंडार
Uddhav Thackeray-Devendra Fadnavis Video: ठाकरे-फडणवीसांमध्ये भेट; अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया.

ठाकरे गटाचा शिव संकल्प मेळावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेपूर्वी वारं फिरलंय. भाजपचा (BJP) बडा नेता आज शिवबंधनात अडकला आहे. यावेळी राजू शिंदे अगोदर शिवसेनेत आले असते, तर मी ३५ हजारांच्या लिडने निवडून आलो असतो असा विश्वास देखील चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय. खैरेंनी देखील राजू शिंदेंचं ठाकरे गटात स्वागत केलाय. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना पाडायचा असल्याचा टोला विरोधकांना लगावला (Vidhan Sabha Election 2024) आहे.

भाजपला मोठं खिंडार
Uddhav Thackeray: आतली बातमी, पावसाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाच्या आमदारांची खलबतं; बैठकीत उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com