Sharad Pawar: 4 महिन्यात मविआचं सरकार येणार, शरद पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election 2024: पुढील चार महिन्यात सरकार बदलणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
4 महिन्यात मविआचं सरकार येणार, शरद पवार यांचा दावा
Sharad Pawar Saam Tv
Published On

पुढील चार महिन्यात सरकार बदलणार, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. सध्याच्या सरकारने काम केलं नाही तर, आपलं सरकार आपल्यावर काम करू, असंही शरद पवार म्हणाले आहेत. आपलं काम चोख करा आणि तुतारीला निवडून आणायचं, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

शरद पवार हे दोन दिवसीय दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आज शरद पवार दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा गावात पोहचले होते. यावेळी ते असं म्हणाले आहेत. दुष्काळाच्या मुद्द्यावरून शरद पवार आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारनं दुष्काळावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

4 महिन्यात मविआचं सरकार येणार, शरद पवार यांचा दावा
Ajit Doval: अजित डोवाल यांची NSA पदावर पुनर्नियुक्ती, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, ''ही निवडणूक महाराष्ट्र हातात घेणार. या निवडणुकीत आपलं काम चोख करायचं. चार महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलं काम चोख करा. तुम्ही सगळे करून दाखवा, तिथं ही तुतारी वाजवा. तुम्ही सगळे (कार्यकर्ते) साथ द्यायला खात्री आहे. राज्यात बदल होत आहे, त्यात महिलांचा मोठा वाटा आहे.''

'दुष्काळ पाहायला आलो अन् पाऊस सुरू झाला'

शरद पवार पुढे म्हणाले की, ''निवडणुका झाल्या, माझ्या लक्षात आलं, राज्यात काही ठिकाणी दुष्काळ आहे. तेव्हा ठरवलं, काही भागात जाऊन लोकांशी बोलावं, अडचणी जाणून घ्याव्यात. दुष्काळ पाहायला आलो अन् पाऊस सुरू झाला.

4 महिन्यात मविआचं सरकार येणार, शरद पवार यांचा दावा
NEET-UG 2024 Scam: NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

ते म्हणाले, ''पाऊसाचा अन् माझ नातं काय आहे माहिती नाही. पाच वर्षापूर्वी सातारामध्ये सभेत पाऊस पडला. एवढा पाऊस पुरेसा नाही, काही ठिकाणी गाळ आहे. साठवण क्षमता कमी आहे. राज्य सरकारचे पाटबंधारे खातं याची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवणार, जर त्यांनी नाही केलं, तर चार महिन्यांनी सरकार बदलायचं आहे. मग काम कशी होत नाहीत, ते बघूच.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com