Ajit Doval: अजित डोवाल यांची NSA पदावर पुनर्नियुक्ती, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला

National Security Advisor: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची एनएसएपदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला आहे.
अजित डोवाल यांची NSA पदावर पुनर्नियुक्ती, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला
Ajit DovalSaam Tv

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची एनएसएपदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही सेवेत मुदतवाढ मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या दोन्ही पदांवरील सेवा विस्तारास मान्यता दिली आहे.

आता अजित डोवाल पुढील 5 वर्षे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर राहणार आहेत. त्यांना कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला असून, तो पूर्वीसारखाच राहणार आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इटलीला जाणार आहेत. येथे ते जी-7 शिखर परिषदेत सहभागी होतील.

अजित डोवाल यांची NSA पदावर पुनर्नियुक्ती, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला
NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

याशिवाय कुवेतमध्ये लागलेल्या आगीत 42 भारतीयांच्या मृत्यू झाला आहे. या घटनेचा पंतप्रधान मोदी यांनीआढावा घेतला. या बैठकीला डोवालही उपस्थित होते. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 'मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यांची 10 जून 2024 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, अजित डोवाल हे आयपीएस अधिकारी आहेत आणि गुप्तचर अधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. 2014 मध्येच ते पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जोडले गेले होते. भारताच्या सुरक्षा धोरणावर अजित डोवाल यांची छाप दिसते.

अजित डोवाल यांची NSA पदावर पुनर्नियुक्ती, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला
Dream 11 : 'पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करू नका', ड्रीम 11 विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; VIDEO

भारताच्या अरब देशांसोबतच्या चांगल्या संबंधांसाठी डोभाल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जातं. मोदी सरकारच्या काळात भारताने पाकिस्तानबाबत कडक धोरण अवलंबले आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने हल्ला केला. याशिवाय पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने आक्रमक कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com