Dream 11 : 'पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करू नका', ड्रीम 11 विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; VIDEO

MNS On Dream 11: पाकिस्तानी क्रिकेट संघ व पाकिस्तानी झेंड्याशी निगडीत वस्तूंची भारतीय बाजारात विक्री केल्याप्रकरणी स्पोर्टा टेक्नॉलॉजीसच्या फॅनकोड अॅपच्या कार्यालयाला मनसेचा दणका.
'पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करू नका', ड्रीम 11 विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; VIDEO
MNS On Dream 11Saam Tv
Published On

मुंबईतल्या बीकेसीत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केलाय. ड्रीम इलेव्हनच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ऑनलाइन पाकिस्तानी कपडे आणि झेंड्याच्या विक्रीच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलंय.

अतिरेकी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानशी कोणता व्यवहार करू नका, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केलीय. मनसेच्या आंदोलनानंतर ड्रीम 11नं पाकिस्तानचे कपडे आणि झेंड्याची विक्री न करण्याचं मान्य केलंय.

'पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करू नका', ड्रीम 11 विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; VIDEO
Manoj Jarange Patil: तोडगा न काढल्यास विधानसभेच्या रिंगणात उतरणार, देसाई -भुमरे यांच्या समोरच मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

एकीकडे वैष्णवदेवी येथे जाणाऱ्या भाविकांवर पाक पुरस्कृत अतिरेकी हल्ला करत आहेत आणि या कंपन्या भरतात पाकिस्तानच्या क्रिकेट जर्सी विकत आहेत. लाज वाटते का? असा सवाल मनसे यावेळी उपस्थित केला आहे. मनसे कामगार सेना सरचिटणीस संतोष धुरी, विभाग अध्यक्ष सुनील हर्षे आणि मनसे कामगार सेना उपाध्यक्ष केतन नाईक यांनी बी.के.सी येथील कार्यालला धडक देत याबाबत जाब विचारला.

याचबद्दल एक निवेदनही मनसेकडून स्पोर्टा टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापाकांना देण्यात आलं आहे. ज्यात म्हटलं गेलं आहे की, ''याद्वारे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, आपल्या आस्थापनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या फॅनकोड या ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅपवर पाकिस्तानी ध्वज व पाकिस्तानी क्रिकेट संघाशी निगडीत असलेल्या वस्तूंची विक्री महाराष्ट्र व देशभरात करण्यात येत आहे. आपणांस कल्पना असेल पाकिस्तान या राष्ट्राकडून वारंवार आपल्या देशाविरोधात अतिरेकी कारवाया करण्यात येत असतात. पाकिस्तानकडून भारतात अर्थव्यवस्थेवर देखील वाईट परिणाम व्हावा म्हणून प्रयत्न होत असतात. पाकिस्तानी कलाकार व खेळाडू यांना भारतात काम करु न देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धोरण व राज ठाकरेंची याबाबतची कठोर भूमिका आपणांस ज्ञात आहेच.''

'पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करू नका', ड्रीम 11 विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; VIDEO
WhatsAPP ची मोठी कारवाई, ७० लाख अकाऊंट केले बंद, तुम्हीही या चुका करू नका, अन्यथा..

यात लिहिलं आहे की, ''लाखो भारतीय नागरिक व सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान राष्ट्राचा ध्वज, लोगो, वस्तू आपल्या देशात विकून आपण भारतीयांच्या भावना दुखावत आहात व भारतीयांना चिडवण्याचे काम करत आहात. इतकेच नव्हे तर या वस्तूंच्या बल्क ऑर्डर्स देखील आपण स्विकारत आहात. म्हणजेच आपण या वस्तूंचा मुबलक प्रमाणात साठा करुन ठेवला आहे.''

यात पुढे म्हटलं गेलं आहे की, ''आपणांस सुचित करण्यात येते की, भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी व सदरची विक्री त्वरित थांबवावी. तसेच ज्या लोकांनी सदरच्या वस्तू भारतात खरेदी केल्या आहेत. त्यांची माहिती देखील प्रसिद्ध करावी जेणेकरुन पाकिस्तानचा पुळका असणाऱ्या देशद्रोह्यांचे चेहरे समोर येतील. आपण तसे न केल्यास आपल्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या प्रचलित पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व यातून उद्धवणाऱ्या सर्व परिणामांची व खर्चाची जबाबदारी आपल्या आस्थापनेची राहिल याची नोंद घ्यावी.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com