Raj Thackeray : मनसे विधानसभा स्वबळावर लढण्याच्या तयारीत? राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडणार?

Raj Thackeray Latest news : महाराष्ट्र नवनिर्माण सेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यामुळे राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मनसे विधानसभा स्वबळावर लढण्याच्या तयारीत? राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडणार?
Raj Thackeray Saam Tv

मुंबई : राज्यातील सर्व राजकीय पक्षांना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मनसेने विधानसभेसाठी २००-२५० जागांची तयारी सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे राज्यातील २५० जागांची चाचपणी करणार आहे. त्यामुळे मनसे पुन्हा 'एकला चलो रे' या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली.

मनसे विधानसभा स्वबळावर लढण्याच्या तयारीत? राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडणार?
Chhagan Bhujbal: लोकसभेनंतर राज्यसभेची उमेदवारी डावलली; मंत्री छगन भुजबळ नाराज? अजित पवार गट काय निर्णय घेणार?

येत्या १५ दिवसांत मनसेचं शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची चाचपणी करणार आहे. जुलै महिन्यांपूर्यंत मनसे उमेदवारांची यादी फायनल करणार असल्याची माहिती हाती आली आहे. या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसे विधानसभा स्वबळावर लढण्याच्या तयारीत? राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडणार?
Beed Politics: मनोज जरांगे 'किंगमेकर'; शरद पवार गटाच्या खासदाराच्या बॅनरवर झळकला फोटो, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय सांगितलं?

बैठकीत कार्यकर्त्यांना संदेश देताना राज ठाकरेंनी म्हटलं की, विधानसभेत २५० ते कमीत कमी २२५ जागांवर उमेदवार उतरावयचे आहेत. या राजकारणात कुठेही धार्मिक आणि जातीयवाद नसला पाहिजे. महाविकास आघाडी आणि महायुतीत दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातीचं राजकारण पाहायला मिळालं. यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला निश्चितच धक्का लागला आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com