NEET-UG 2024 Scam: NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

Congress on NEET-UG 2024 Scam: नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या कथित फेरफार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी
Congress Gaurav Gogoi On NEET-UG 2024 ScamSaam TV

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET-UG) 2024 मध्ये झालेल्या कथित फेरफार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी पुन्हा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला त्यांनी २४ जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला जाईल, असे सांगितले.

गोगोई म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीबीआयने करायला हवा, पण सरकार त्यासाठी तयार नसेल तर तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवा.

NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी
Dream 11 : 'पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करू नका', ड्रीम 11 विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; VIDEO

याआधी गुरुवारी, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, 1,563 नीट परीक्षेतील उमेदवारांना ग्रेस गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्या विद्यार्थ्यांना 23 जून रोजी पुन्हा परीक्षेचा पर्याय दिला जाईल. केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) वकिलांनी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीतील खंडपीठाला सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहेत, त्यांना पुन्हा परीक्षेचा पर्याय दिला जाईल. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीटमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप फेटाळून लावला आणि याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले.

काँग्रेस खासदार गोगोई यांनी पत्रकारांना सांगितले की, "संपूर्ण देश निवडणूक निकालांवर लक्ष केंद्रित करत असताना 4 जून रोजी नीटचा निकाल का जाहीर करण्यात आला, हे एक रहस्य आहे. यावरून असे दिसून येते की, त्यांना यावरून वाद होऊ शकतो, याची कल्पना होती."

NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी
Manoj Jarange Patil: तोडगा न काढल्यास विधानसभेच्या रिंगणात उतरणार, देसाई -भुमरे यांच्या समोरच मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

गोगोई म्हणाले, "म्हणूनच आम्हाला या संपूर्ण घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी हवी आहे. कारण हा 24 लाख तरुणांच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com