शरद पवार, सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

shahupuri police charged satej patil and sharad pawar karykarta illegal hoarding case: या निवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचा माेठा मताधिक्याने विजय झाला. या विजयात सतेज पाटील यांचा माेठा वाटा असल्याचे मानले जाते.
shahupuri police charged satej patil and sharad pawar karykarta illegal hoarding case
shahupuri police charged satej patil and sharad pawar karykarta illegal hoarding caseSaam Tv

- रणजीत माजगावकर

कोल्हापुरातील शाहूपुरी पाेलिसांनी काॅंग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांवर विना परवाना हाेर्डिंग लावणे आणि शहर विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर येथे लावण्यात आलेल्या त्या हाेर्डिंगची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली हाेती.

कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात युवक काँग्रेसच्या वतीने हाेर्डिंगवर एक अनोखे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावरील आमदार सतेज पाटील यांचा छायाचित्र आहे. त्याच बाजूला आता कशी वाजवली घंटी असा मजकूर नमूद आहे.

shahupuri police charged satej patil and sharad pawar karykarta illegal hoarding case
Graduate Constituency Election News: उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसला गप्प केले, हिम्मत असेल तर..., नितेश राणेंचे नाना पटाेलेंना आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतेज पाटलांवर टीका करत बंटीची घंटी वाजवली पाहिजे असे वक्तव्य केले होते. या निवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचा माेठा मताधिक्याने विजय झाला. या विजयात सतेज पाटील यांचा माेठा वाटा असल्याचे मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून दाभोळकर कॉर्नर येथे संबंधित पोस्टर्स लावल्याची चर्चा काेल्हापूरात हाेती.

दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी सतेज पाटील आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांंवर विनापरवाना होर्डिंग लावणे तसेच शहर विद्रुपीकरणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

shahupuri police charged satej patil and sharad pawar karykarta illegal hoarding case
डाॅक्टरच्या अटकेसाठी आयएमए संघटना सरसावली, पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन; नेमकं काय घडलं सांगाेल्यात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com