Maharashtra Politics: अजितदादांना बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसणार, माजी आमदारासह शेकडो कार्यकर्ते आज शरद पवार गटात प्रवेश करणार

Ajit Pawar Group Corporators Will Join Sharad Pawar Group: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आज अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे.
शरद पवार गटात प्रवेश करणार
Ajit Pawar Group Corporators Will Join Sharad Pawar GroupSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आज मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा आज शरदचंद्र पवार गटात प्रवेश होणार आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार गटाला झटका बसण्याची चिन्हे आता दिसत आहेत. बालेकिल्ल्यामध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसत असल्याचं दिसत आहे.

अजित पवार गटातील कार्यकर्ते शरद पवार गटाच्या वाटेवर

पिंपरी चिंचवडमध्ये आज अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह १५ पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवारांसोबत येणार असल्याचं समोर आलंय. आज सकाळी ११ वाजता शरद पवार यांच्या मोदी बाग या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय.

पिंपरी चिंचवड अजित पवार यांचा बालेकिल्ला

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु लोकसभेच्या निकालानंतर वातावरण बदललं आहे. चिंचवड आणि भोसरीमध्ये सध्या भाजपचा आमदार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी देखील भाजप उमेदवाराला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत असल्याचं (Sharad Pawar) दिसतंय. कदाचित त्यामुळे अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जातंय.

शरद पवार गटात प्रवेश करणार
VIDEO: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, Ajit Pawar यांना उत्तर सादर करण्याचे आदेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार विलास लांडे, स्थायी समितीचे मा.अध्यक्ष अजित गव्हाणे यांसह (Maharashtra Politics Vidhan Sabha Election) भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तरी यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटात प्रवेश करणार
VIDEO: Sunetra Pawar यांची पुण्यातील मोदी बागेत भेट, Sunil Tatkare यांची प्रतिक्रिया काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com