Ajit Pawar: आपला वादा पक्का असतो; भरपावसात अजित पवारांची विरोधकांविरोधात जोरदार बॅटिंग
सरकारने सुरू केलेल्या योजना कायमस्वरुपी चालू ठेवायचं असले तर,विधानसभेला महायुतीला निवडून द्या. घोषणांचा जोर विधानसभापर्यंत असाच ठेवा. हवसे,नवसे,गावसे येतील, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका,असं म्हणत अजित पवारांनी बारामतीत विरोधकांवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत जन सन्मान मेळावा झाला. या सभेवेळी पावसाने हजेरी लावली, तरीही कार्यकर्त्यांनी आपली जागा न सोडता अजित पवारांचं भाषण डोक्यावर खुर्च्या घेऊन ऐकलं. अजित पवारांनी सरकारने सुरू केलेल्या योजनांचा पाढा वाचला. त्याबरोबर त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. राज्यात सुरू करण्यात आलेल्या योजनांवर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सुरू केलीय. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ही योजना कायमस्वरुपी करायची आहे. त्यामुळे महायुतीला विधानसभेतही जिंकून द्यायचं आहे. तेव्हा ही योजना कायम चालू राहील, हवसे , नवसे , गवसे येतील आणि योजन हा अजित दादा आहे , शब्दाचा पक्का आहे. असं अजित पवार म्हणाले.
विरोधकांनी लोकसभेला वेगळं वातावरण तयार करण्यात आलं.खोटा प्रचार केला. संविधान बदलणार या विरोधकांच्या दाव्याला काहीच तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले. आम्ही खोटं बोलणार नाही, सत्ता येते सत्ता जाते. ताम्र पाठ घेऊन कोणी आलेलं नाही. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.