Big Blow To Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये प्रवेश

Big Blow To Uddhav Thackeray: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

  • जिंजर हॉस्पिटलिटीमधील शेकडो कामगारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.

  • सर्व कामगारांनी भाजपच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेत प्रवेश केला.

  • रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

संजय गडदे, मुंबई

आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतल्या जिंजर हॉस्पिटलिटीमधील सर्व कामगारांनी पक्षाची साथ सोडली. या सर्वांनी भाजपाच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज शेकडो कामगारांनी पक्षप्रवेश केला. लवकरच अन्य हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पक्ष संघटना बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटातून आउटगोइंग थांबण्याचे नावच घेत नाही. आज मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेकडील जिंजर हॉस्पिटलिटीमधील भारतीय कामगार सेनेच्या सर्वच कामगारांनी शिवबंधन तोडून भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेत प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कर्मचाऱ्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते कामगार संघटनेच्या नवीन फलकाचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, 'काही संघटनांची इथे मोनोपॉली चालत होती. मात्र आता कामगारांचे हित भारतीय जनता पक्षच साधू शकतो. हे लक्षात आल्यानंतर शेकडो कामगारांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय लवकरच अन्य हॉटेलमधील देखील कामगार भाजपात प्रवेश करतील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'माझ्याशी एकट्यात फ्लर्ट करते...'; अभिषेक बजाजने तान्या मित्तलची केली पोलखोल, लावले गंभीर आरोप

Maharashtra Politics: चिखली द्या, बुलढाणा घ्या! शिवसेना आमदाराची थेट भाजपकडे मागणी, नेमकं काय घडलं? VIDEO

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी हात-पायांमध्ये दिसतात ५ मोठे बदल; 99% लोकं करतात दुर्लक्ष

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Chanakya Niti: तोंडावर गोड अन् मागे वाईट बोलणाऱ्यांना कसं हाताळायचं?

SCROLL FOR NEXT