Maharashtra Politics: ठाकरे बंधूंचं ठरलं! दिवाळीत युती; दोन फॉर्म्युल्यावर चर्चा, कोणत्या भावाला किती जागा मिळणार?

Thackeray Brothers Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू या दिवाळीला युतीची घोषणा करतील. दोन्ही भावांमध्ये तर जागावाटपाची चर्चा होत असून दोन फॉर्म्युल्यावर वाटाघाटी चालूय.
Thackeray Brothers Alliance
Thackeray brothers’ alliance talks heat up ahead of Diwali and BMC elections.saam tv
Published On
Summary
  • मुंबई महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची आहे.

  • मुंबईत समसमान तर उपनगरांमध्ये ६०-४० च्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे.

  • ठाकरे बंधू दिवाळीत युती करू शकतात.

शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा नुकताच टीझर प्रदर्शित झालाय. या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दोन्ही भावांमध्ये युतीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबतच्या फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून अंतिम चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीला चांगलेच आव्हानात्मक ठरणार आहेत. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार निवडणुका लढणार असल्याचे म्हटलं जात आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपाबाबत दोन फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Thackeray Brothers Alliance
कोकणात राज ठाकरेंना डबल धक्का, वैभव खेडेकरनंतर आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर

मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडची परीक्षा असणार आहे. भाजप आणि महायुतीला ठाकरे ब्रँण्डचा दमखम दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांनी रणनीती ठरवलीय. मुंबईत समसमान तर उपनगरांमध्ये ६०-४० च्या फॉर्म्युल्यावर दोन्ही भावांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना मुंबईतील जागांची यादी करण्याचे आदेश दिलेत.

Thackeray Brothers Alliance
Ajit Pawar: अजित पवार यांनी राजीनामा द्यावा; कोणी अन् का केली मागणी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबईत पालिकेचे एकूण २२७ प्रभाग आहेत. यापैकी १४७ जागांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दावा केलाय. तर मनसेला ८० जागा सोडण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवलीय. पण मनसेला ९५ जागा हव्यात. मागील निवडणुकीत मनसेच्या ७ जागा निवडून आल्या होत्या. ही निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्याआधी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे २८ उमेदवार विजयी झाले होते.

दुसरीकडे ठाकरे गटाचे मुंबईत ३ खासदार आणि १० आमदार आहेत. २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या ८४, तर भाजपने ८२ जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२२ शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे आतापर्यंत निम्म्या माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com