Maharashtra Politics: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवळे यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Former Shiv Sena MLA Prakash Deole Death: शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन झाले. ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Maharashtra Politics: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवळे यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
Former Shiv Sena MLA Prakash Deole passes awaySaam Tv
Published On

Summary -

  • शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे पुण्यात निधन झाले.

  • ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • राजकारणाबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते.

  • आज पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप कांबळे, मावळ

शिवसेनेचे निष्ठावान आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले माजी आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश केशवराव देवळे यांचे निधन झाले. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. ही बातमी मनाला अतिशय वेदना देणारी आहे.

त्यांच्या जाण्याने केवळ एका राजकीय नेत्यालाच नव्हे, तर एक सामाजिक कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ आणि एक सच्चा माणूस गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रकाश देवळे यांच्या पार्थिवावर २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे यांचे मूळ गाव पुणे होते. त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले होते. शिरगाव गावात त्यांनी २००१ मध्ये प्रतिशिर्डी साई मंदिर उभे करून अनेकांच्या श्रद्धेचे केंद्र निर्माण केले. १९९६ मध्ये विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. ही कामगिरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरली.

Maharashtra Politics: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवळे यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Politics: निवडणुकीसाठी 3 कोटी आणि 100 बोकडं निवडणूक खर्चावरुन आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान

राजकारणाबरोबरच त्यांनी अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ते शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख, बांधकाम व्यावसायिक, आणि ऑर्केस्ट्राकारही होते. मराठी चित्रपट ‘मायेची सावली’चे निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणूनही त्यांची ओळख होती. 'कलायात्री शिक्षण संस्था' स्थापन करून हजारो भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य हे त्यांचे सामाजिक भान दर्शवते.

Maharashtra Politics: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवळे यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Politics: जळगावात भाजपकडून ठाकरेंना दे धक्का, १५ शिलेदारांनी सोडली साथ; 'कमळ' हाती घेणार

अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा 'समाज भूषण पुरस्कार' मिळाला होता जो त्यांच्या कार्याची योग्य पावती होती. त्यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे यांच्यासह संपूर्ण समाज एका आधारवडला मुकला आहे. देवळे साहेबांचे व्यक्तिमत्त्व हे साधे, सरळ आणि जनसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्ती व विश्वासू होते.

Maharashtra Politics: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवळे यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com