Mahant Narayangiri On Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Mahant Narayangiri: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, उद्धव ठाकरेंनीच धोका दिला : महंत नारायणगिरी

Mahant Narayangiri On Uddhav Thackeray: शंकराचार्य आणि उद्धव ठाकयांच्या भेटीवर आता महंत नारायणगिरी यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनीच धोका दिला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Priya More

गिरीष कांबळे, मुंबई

उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेसोबत विश्वासघात झालाय असे वक्तव्य जगद्गुरू शंकराचार्य (swami-avimukteswarananda-shankaracharya) यांनी केले होते. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील टीका केली होती. शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीवर आता महंत नारायणगिरी यांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार होते. पण उद्धव ठाकरे यांनीच धोका दिला, असल्याचे वक्तव्य महंत नारायणगिरी यांनी केले आहे.

महंत नारायणगिरी यांनी सांगितले की, श्रीशंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले होते. शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाही. मात्र उद्योगपती मोठ्या विवाहात जातात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत ते गेलेत. शंकाराचार्य अशा लोकांच्या घरी जाऊन म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना धोका दिला. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला.

'शंकराचार्यंचा आदर करतो, धर्म आणि राष्ट्रापेक्षा कोणताही संत मोठा नसतो. जय -पराजय हे आम्ही सांगायला नको. ते काम जनतेचं आहे. आमचे काम पूजापाठ करण्याचे आहे. आम्ही कोणाला धोकेबाज म्हणतो, विश्वासघातकी म्हणतो, अशी विधानं देताना विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे विद्रोहीसोबत गेले आहेत. त्यांच्या घरी जात त्यांना आशीर्वाद देणे आणि भेट घेणे चुकीचं आहे.', असे मत देखील महंत नारायणगिरी यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT