बुलढाणा : एखाद्या देवस्थानला किंवा पर्यटनस्थळी गेल्यावर सर्वात मोठा प्रश्न हा कार पार्किंगचा असतो. मात्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाच्या शिस्तबध्द नियोजनामुळे आता शेगावाच्या मंदिर परिसरात अतिशय हायटेक आणि ऑटोमोटेड असे वाहनतळ उभारण्यात आले आहे. त्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगचा प्रश्न मिटला आहे. ही वाहनतळाची सेवा पूर्णपणे मोफत ठेवली आहे.
संत गजानन महाराज सेवा संस्थांनचे शिस्तबद्ध काम व स्वच्छता सर्वानाच परिचित आहे. संस्थानने (Buldhana) अनेक धार्मिक ठिकाणावर केंद्र उभारून तेथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वस्त दरात राहण्याची सुविधा केलेली आहे. तर शेगाव (Shegaon) येथील मंदिर परिसरात तर नियोजनबद्ध कामांमुळे भाविकांना येथे कुठल्याच प्रकारचा त्रास होत नसल्याचे पाहण्यास मिळते. तर आता संस्थानने आलेल्या भाविकांच्या वाहन पार्किंगचा देखील प्रश्न सोडविला आहे. संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला येणाऱ्या देश विदेशातील भक्तांच्या सोयीसाठी संस्थानने उभारलेले हे वाहनतळ चार एकर जागेत अतिशय प्रशस्त आणि भव्य अस वाहनतळ उभारले आहे.
५ हजार कारची सुविधा
चार एकरातील या वाहनतळात अतिशय स्वच्छ्ता तर आहेच, पण या वाहनतळमध्ये पाच हजार कारसह तीन हजार दुचाकीचे दिवसभरात आवागमन होईल अशी क्षमता आहे. ते जी संपूर्णतः ऑटोंमोटेड आहे. येथे वाहन पार्क करण्यासाठी A ते Z पर्यंत वेगवेगळे झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये २०० कार पार्क करता येईल अशी क्षमता आहे. अत्यंत सोपी अशी कार लोकेशन आयडेंटीफिकेशन सिस्टीम असून परिसरात अत्यंत स्वच्छता असलेलं हे अशा प्रकारचं देशातील देवस्थानात एकमेव अस पार्किंग असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली असून मंदिराच्या अगदी जवळ असल्याने वाहनातून उतरल्यावर सहज दर्शनाची सोय सुद्धा करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.