गिरीश कांबळे, मुंबई|ता. ११ जुलै २०२४
लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
"निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे. एक नेते उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला, पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत," असे शरद पवार म्हणाले.
"महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. लोकसभा लोकांनी हातात घेतली. लोकांनी मोदीचे सरकार पाहिलं आणि बदलण्याचा निर्णय घेत ३१ जणांना निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या. हा एक संदेश आहे, असे म्हणत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी विरोधकांच्या (मविआ) 225 जागा निवडून येतील," असा मोठा आकडा शरद पवार यांनी सांगितला.
"तुम्ही येताना वेगळ्या नावाने मत मागता आणि दुसरीकडे जाता हे लोकांना पटत नाही. जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं आपल्याकदे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतोसुधाकर भालेराव आणि इतर नेते पक्षात आले आहेत, आपण पक्षात आलात. हे घर तुम्हा सर्वांचं आहे, तुमची आमची जबाबदारी वाढली आहे," असं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.