Pune Breaking: अरे बापरे! जिल्ह्यात ५० अनधिकृत शाळा, शिक्षण विभागाचा पालकांना सावधतेचा इशारा

50 Unauthorized Shools List Announced In Pune: पुणे जिल्ह्यात ५० अनधिकृत शाळा असल्याचं समोर आलंय. शिक्षण विभागाने पालकांना सावधतेचा इशारा दिलाय.
पुणे जिल्ह्यात ५० अनधिकृत शाळा
Pune SchoolSaam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यातून शाळांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. जिल्ह्यातील ५० अनधिकृत शाळांची यादी जाहीर झालीय. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना पाल्याचा प्रवेश घेताना सावधानतेचा इशारा दिला आहे. पालकांनो सावधान, तुमच्या मुलांना अनधिकृत शाळेत प्रवेश पाठवू नका, असं आवाहन जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने (Pune Breaking News) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. तसंच या अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचं आवाहनही केलं आहे.

पुणे शहरातील अनधिकृत शाळांची यादी :

पुणे शहरात ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, नारायणा इ टेक्नो स्कूल, दि गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल, इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, सी. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल, (Pune News) द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल, मेरीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, शिव समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, दारूल मदिनाह स्कूल, टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲँड मक्तब, लेगसी हायस्कूल, इमॅन्युअल पब्लिक स्कूल या अनधिकृत शाळा आहेत.

दौंड तालुक्यात किडजी स्कूल, अभंग शिशू विकास, यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल तर हवेली तालुक्यात रामदास सिटी स्कूल, श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर आणि प्राथमिक विद्यालय खेड तालुक्यामध्ये भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल तर मावळ तालुक्यात (Pune School) जीझस क्राईस्ट इंग्लिश मीडियम, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल, व्यंकेश्‍वरा वर्ल्ड स्कूल, किंग्ज वे पब्लिक स्कूल या शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलंय.

पुणे जिल्ह्यात ५० अनधिकृत शाळा
Zilha Parishad School : वर्ग खोल्या नसल्याने खुल्या मैदानात झाडाखाली भरतेय शाळा; अकोला जिल्हा परिषद शाळांची अवस्था

मुळशीमध्ये रुडिमेंट इंटरनॅशनल स्कूल, एंजल इंग्लिश स्कूल, चाणक्य ज्युनिअर कॉलेज, इलाईट इंटरनॅशनल स्कूल, वीविद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल, महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल, (Education Department) अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, संस्कार प्रायमरी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, एल.प्रो इंटरनॅशनल स्कूल, माउंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, सरस्वती विद्या मंदिर तर पुरंदरमधील श्रीनाथ इंग्लिश मीडियम अनधिकृत शाळा आहे.

पुणे जिल्ह्यात ५० अनधिकृत शाळा
Schools Closed Tomorrow: मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com