Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde: मी डॉक्टर नसलो तरी अनेकांची मोठ मोठी ऑपरेशन केली, शिंदेचा ठाकरेंना टोला

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. 'मी जरी डॉक्टर नसलो तरी मोठ मोठी ऑपरेशन मी केली आहेत. कोणाचा मानेचा पट्टा. कोणाचा कमरेचा पट्टा मी सरळ केला आहे.', असा टोला त्यांनी लगावला.

Priya More

'मी जरी डॉक्टर नसलो तरी मोठं मोठी ऑपरेशन मी केली आहेत.', असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना कोल्हापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रदान करण्यात आली. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी हे मोठं विधान केले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांचे कौतुक केले. त्याचसोबत त्यांनी विरोधकांना खडेबोल देखील सुनावले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांचे कौतुक करताना सांगितले की, 'दीपक सावंत यांचा प्रवास सर्वांनी पाहिला आहे. ते एक विश्वासू कार्यकर्ता आहेत. सोबत कोणी असेल तर मार्गदर्शन चांगलं होतं आणि अशी पदवीधर माणसं मिळतात. दीपक सावंत यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं ते सर्वांच्या लक्षात आहे.'

उपमुख्यमंत्री यावेळी त्यांच्याबद्दल सांगताना म्हणाले की, 'काही लोकांना माहीत नसेल मला देखील अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. बीए झालो मग फायनल करायला गेलो. २०२२ मध्ये ही परीक्षा सुरू झाली आणि ते राहून गेलं. राज्यात सर्व सामान्य माणसाचं हे सरकार स्थापन झाले. दीपक सावंतांनी आरोग्य विभागात चांगलं काम केलं. त्याच्या रूपाने एक दूरदृष्टी असलेला डॉक्टर शिवसेनामध्ये आहे याचा मला अभिमान आहे. कोविड काळातमध्ये काय होणार कोणालाच माहीत नव्हतं. पण दीपक सावंतांनी चांगले काम केले.'

एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंताबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'तुम्हाला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं. तसंच मला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं होतं. तसा मी काही हलका नव्हतो. मी जरी डॉक्टर नसलो तरी मोठ मोठी ऑपरेशन मी केली आहेत. कोणाचा मानेचा पट्टा. कोणाचा कमरेचा पट्टा सरळ केला आहे. ', अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Chanakya Niti: हुशार लोक या 6 ठिकाणी धाडस दाखवत नाहीत; खड्ड्यात पडण्यापासून व्हा सावध, वाचा चाणक्यांचा सल्ला

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

SCROLL FOR NEXT