Ladki Bahin Yojana : लाडकीला २१०० रुपये कधी देणार? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं आहे. २१०० रुपये कधी मिळणार, यावर शिंदेंनी भाष्य केलं आहे.
eknath shinde News
eknath shinde Saam tv
Published On

ladki bahin yojana on Eknath Shinde : महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना योजनेतून महिना २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, महायुती सत्तेवर आल्यानंतरही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असल्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी महिना २१०० रुपयांच्या प्रतिक्षेत आहेत. लाडक्या बहिणींना महिना २१०० कधी मिळणार, याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

eknath shinde News
Shocking News : वंशाच्या दिव्यासाठी बाप झाला हैवान; ५ महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून ठार मारलं

एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला भेट दिली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. लाडक्या बहिणींच्या हप्त्याविषयी भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'लाडकी बहीण योजना १५०० रुपयांनी सुरु केली. आता २१०० रुपये दिले जाणार हे आमचेच आश्वासन आहे. आम्ही जे बोललो, ते बोललो पूर्ण करणार आहोत'.

eknath shinde News
Shocking : आई की कसाई? २२ दिवसांचा चिमुकला दुर्धर आजाराने ग्रस्त; आईने अंधश्रद्धेतून दिले बाळाच्या पोटावर चटके

कर्जमाफीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणारं आमचं सरकार आहे. जाहिरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार आहोत. आम्ही जाहिरनाम्यात प्रिंट मिस्टेक म्हणणार नाही. आर्थिक परिस्तिथी संभाळून सर्व मागण्या पूर्ण करणार आहोत'.

'आम्ही वीज बिलमाफीची घोषणा केली. सरकार आल्यावर शेतकऱ्यांना वीजबिले पाठवली. आम्ही जो शब्द दिला तो पार पाडणार आहोत. राज्याची आर्थिक स्थिती संभाळून कसरत करुन योजना सुरु ठेवणार आहोत, असे शिंदेंनी सांगितलं.

eknath shinde News
Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा भूकंपाने हादरलं; आतापर्यंत १००० हून अधिक जणांचा मृत्यू, २३७६ जखमी

छत्रपती संभाजी महाराजांवर भाष्य करताना म्हटलं की, 'छत्रपती संभाजी शौर्याचे प्रतिक आहे. स्मारक तिर्थक्षेत्र व्हावं, यासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी दिला. गडकोट किल्याचे संवर्धन करणं आमचं काम आहे. गडावरील अतिक्रमण मुक्त करणार आहे. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारेही कलंक आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com